no images were found
“आम्ही गाड्या पाठवल्या नाहीत, शिवसैनिक कष्टाची भाकर घेऊन येतात -सुषमा अंधारे
शिवसेना पक्ष फूटल्यानंतर होणाऱ्या दोन्ही गटांच्या दुसऱ्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. दोन्ही गटांच्या मेळाव्यासाठी एक लाखापेक्षा जास्त शिवसैनिक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन्ही गट या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करणार आहेत. ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा मुंबईतल्या प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज पार्क (दादर) येथे होणार आहे. तर दक्षिण मुंबईतल्या आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा पार पडणार आहे.
या दसरा मेळाव्यावरून दोन्ही गट एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. “आमचा मेळावा आहे, बाकीच्या इ्व्हेंटचं आम्हाला काही माहिती नाही. लोकांनी इव्हेंटला यावं यासाठी त्यांनी गाड्या पाठवल्या असतील, आम्ही आमच्या मेळाव्यासाठी गाड्या पाठवलेल्या नाहीत”, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे