no images were found
गुगलच्या ‘या’ कर्मचाऱ्याकडे बॉस सुंदर पिचाईंपेक्षा जास्त संपत्ती!
भारतीय जगभरातील विविध क्षेत्रात व्यवसाय, नोकरीसाठी विदेशात आहेत. नुकतीच 360 वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 जाहीर झाली. यामध्ये सर्वात श्रीमंत भारतीय म्हणून जयश्री उल्लाल पासून सुंदर पिचाई यांची निवड झाली आहे. या यादीत थॉमस कुरियन १५,८०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. थॉमस कुरियन हे गुगल क्लाउडचे सीईओ आहेत तर सुंदर पिचाई हे गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ आहेत.सुंदर पिचाई यांच्या हाताखाली काम करुनही थॉमस कुरियन यांनी संपत्तीच्या बाबतीत पिचाई यांना मागे टाकले आहे. थॉमस हे सध्या जगातील दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय व्यवस्थापक आहेत.
थॉमस हे मुळचे केरळचे आहेत, त्यांच्या भावासोबत त्यांनी अभियांत्रिकी शिकण्यासाठी IIT मद्रासमध्ये प्रवेश घेतला, पण ते फक्त १६ वर्षांचे असताना दोन्ही भावांनी शिक्षण सोडले आणि अभियांत्रिकी शिकण्यासाठी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात प्रवेश घेतला. यानंतर थॉमस कुरियन यांनी स्टॅनफोर्डमधून एमबीएची पदवी मिळवली.
थॉमस यांनी पहिली नोकरी मॅकिन्से अँड कंपनीमध्ये ६ वर्षे केली. १९९६ मध्ये जेव्हा ते ओरॅकलमध्ये सामील झाले तेव्हा ते त्यांच्या व्यावसायिक जीवनातला एक टर्निंग पॉइंट ठरला. त्यांनी ३२ देशांमध्ये ३५००० कर्मचाऱ्यांचे नेतृत्व केले आहे. २०१८ मध्ये नोकरी सोडल्यानंतर ते गुगलमध्ये रुजू झाले. गुगल क्लाउडवरील त्यांची पहिली रणनीती म्हणजे ग्राहक सेवेवर भर देणे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी गुगल क्लाउड सेल्स टीमचे पगारही वाढवले. त्यांनी कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवली.
थॉमस कुरियन, यांची एकूण संपत्ती १५,८०० कोटी रुपये आहे, ते सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यवस्थापक आहेत. त्यांचे बॉस सुंदर पिचाई यांची नेट वर्थला त्यांनी मागे टाकले आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांची संपत्ती त्यांच्यापेक्षा ७५०० कोटी रुपये कमी आहे. गुगल क्लॉडने २०२२ मध्ये २६.२८ अब्ज डॉलर कमाई केली, जे कंपनीच्या एकूण कमाईच्या ९.३ टक्के आहे.