
no images were found
जुना राजवाडा कमानीस तांब्याच्या कलशाचे तोरण
कोल्हापूर : हील रायडर्स तर्फे मंगळवार दि.२४ रोजी विजयादशमी दसरा या शुभ दिनी जुना राजवाडा कमानीस तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात आले. या उपक्रमात वृद्धाश्रमातील आजी आजोबा यांच्या हस्ते तांब्याच्या कलश तोरणाचे पूजन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची विशेष उपस्थिती होती. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात महिलांसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या महिला संस्थांना रणरागिणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प. देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, संमती मिरजे, गणी आजरेकर, स्नेहल घाटगे, सुप्रिया दळवी, विनोद कंबोज, चंदन मिरजकर, उदय गायकवाड, प्रमोद पाटील, आनंद काळे, जगदीश मोरे, ऋषिकेश केसकर व समस्त हील रायडर्स परिवार उपस्थित होता.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी उपस्थितांना दसरा व विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले, हिल रायडर्सच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील विविध संस्थांना सन्मान देऊन त्यांना प्रोत्साहन दिले जाते, ही बाब सामाजिक कार्यात दखल घेण्यासारखी आहे. असेच सामाजिक काम आपल्या हातून होवो ही सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बगाडे यांनी केले.