
no images were found
कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करणाऱ्या महाविकास आघाडीच्या निषेधार्थ भाजपाची तीव्र निदर्शने
कोल्हापूर ( प्रतिनीधी) : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्यावतीने आज बिंदू चौक येथे तरुण , बेरोजगारांना कंत्राटी पद्धतीने शासकीय नोकर भरती चे आमिष दाखविणाऱ्या महाविकास आघाडीचा आंदोलन करून निषेध करण्यात आला.कोल्हापूर बरोबरच आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शहर व जिल्ह्याच्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध आंदोलने करण्यात आली.मागे महाविकास आघाडीच्या शासन काळामध्ये युवकांची दिशाभूल करणारा हा कंत्राटी नोकर भरती प्रक्रिये चा निर्णय घेण्यात आला होता .कंत्राटी नोकर भरती प्रक्रिया रद्द झाल्या बाबत कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरीषेत मध्ये ही माहिती दिली होती.
या आंदोलनाच्यावेळी भाजपा पदाधिकारी व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाजपा खासदार धनंजय महाडिक आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, महाविकास आघाडीने त्यांच्या शासनकाळी कंत्राटी पद्धतीने शासकीय नोकर भरती प्रक्रिया राबविली होती. आज महाविकास आघाडीचे नेते विरोध करत आहेत. ह्या निषेर्धात त्या वृत्तीचा खासदार धनंजय महाडिक यांनी निषेध केला.
यानंतर भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी ते म्हणाले ,” महाराष्ट्रात बेरोजगारी कमी करण्यासाठी कंत्राटी भारती करणे गरजेचे आहे हि वस्तुस्थिती माहित असून महाविकास आघाडीचे नेते हीन दर्ज्याचे राजकारण करत आहेत. २००५, २०११ व २०१३ काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हीच प्रक्रिया राबवली होती. त्यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाने विरोध केला नाही. पण आज लोकप्रियतेसाठी व राजकारणासाठी महाविकास आघाडीचे नेते विरोध करत आहेत ,”या वृत्तीचा महेश जाधव यांनी निषेध केला.
जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले माजी पृथ्वीराज चव्हाण अशोकराव चव्हाण यांनी आपल्या काळात कंत्राटी भरती केली याचा जी.आर. काढला आहे. याचा आजच्या नेत्यांना विसर पडला आहे. तरुणांच्या हक्काच्या नोकरी व रोजगार घालवण्याचे पाप महाविकास आघाडीने केले आहे असे त्यांनी मत मांडले. यावेळी महाविकास आघाडीच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, विधानसभा प्रमुख सत्यजित उर्फ नाना कदम, संजय सावंत, सदानंद राजवर्धन, अजित ठाणेकर, दीपक जाधव, गणेश देसाई, हेमंत आराध्ये, राजू मोरे, आप्पा लाड, शैलेश पाटील, धनश्री तोडकर, विजयसिंह खाडे – पाटील, भरत काळे , संतोष भिवटे, रशीद बारगीर, आशिष कापडेकर, रोहित पवार, संगीता खाडे, प्रदीप उलपे, सुनिलसिंह चव्हाण, विशाल शिराळकर, सतीश घरपणकर, रुपाराणी निकम, गिरीश साळोखे, दिलीप मैत्रानी, अशोक लोहार, संदीप कुंभार, सचिन तोडकर, हर्षद कुंभोजकर, अरविंद वडगावकर, महेश यादव, हंबीरराव पाटील, नाथाजी पाटील, के एन पाटील, विठ्ठल पाटील, डॉ आनंद गुरव, किरण नकाते, सुमित पारखे, विवेक वोरा, अमेय भालकर, गौरव सातपुते, प्रसाद पाटोळे, हर्षवर्धन पाटील, ओमकार गोसावी उपस्थित होते.