
no images were found
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन
कोल्हापूर : ग्रामीण भागाकडून शहराकडे होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, तसेच ग्रामीण भागातील युवक व युवतींना स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता महाराष्ट्रातील 511 ग्रामपंचायतीमध्ये “प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” कार्यक्रम सुरु करण्याबाबत घोषणा केली आहे. या अनुषंगाने निवड करण्यात आलेल्या सर्व 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन गुरूवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभहस्ते व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष राहूल रेखावार यांनी दिली आहे.
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र मध्ये 18 ते 45 वयोगटातील युवक युवतींना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 21 ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामीण प्रशिक्षण केंद्र हे स्थापित करण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र प्रस्थापित करण्यात येत आहे. तालुकानिहाय प्रशिक्षण केंद्र -आजरा तालुक्यातील- आजरा व उत्तूर, भुदरगड तालुक्यातील गारगोटी व मडिलगे, चंदगड तालुक्यातील – चंदगड व माणगाव, गडहिंग्लज तालुक्यातील – भडगाव व महागाव, गगनबावडा तालुक्यातील – गगनबावडा, हातकणंगले तालुक्यातील – कबनूर, पुलाची शिरोली, कागल तालुक्यातील – कापशी, कसबा सांगाव, करवीर तालुक्यातील – उचगाव, पन्हाळा तालुक्यातील – कोडोली व कळे, राधानगरी तालुक्यातील – राधानगरी व राशिवडे बुद्रुक, शाहुवाडी तालुक्यातील – सरूड व शित्तूर तर्फ वारुण व शिरोळ तालुक्यातील – लाट
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणद्वारे (Live Telecast) online उद्घाटनवरील 21 केंद्रांच्या ठिकाणी होणार असल्याने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय तसेच शासकीय-खाजगी ITI तील सर्व विद्यार्थी यांनी तसेच त्या त्या तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने नजीकच्या प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
कार्यक्रम स्थळाच्या अधिक माहितीसाठी तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क साधावा.