Home Uncategorized ऑराकडून महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूरमध्‍ये पहिल्‍या स्‍टोअरचे उद्घाटन; सणासुदीच्‍या काळापूर्वी आपल्‍या रिटेल उपस्थितीमध्‍ये केली वाढ 

ऑराकडून महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूरमध्‍ये पहिल्‍या स्‍टोअरचे उद्घाटन; सणासुदीच्‍या काळापूर्वी आपल्‍या रिटेल उपस्थितीमध्‍ये केली वाढ 

3 min read
0
0
32

no images were found

ऑराकडून महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूरमध्‍ये पहिल्‍या स्‍टोअरचे उद्घाटन; सणासुदीच्‍या काळापूर्वी आपल्‍या रिटेल उपस्थितीमध्‍ये केली वाढ 

भारतातील आघाडीच्‍या डायमंड ज्‍वेलरी ब्रॅण्‍डकडून त्‍यांच्‍या विस्‍तारीकरण योजनांचा भाग म्‍हणून कोल्‍हापूरमध्‍ये नवीन स्‍टोअरचे उद्घाटन 

ऑरा या भारतातील डायमंड ज्‍वेलरीसाठी आघाडीच्‍या ब्रॅण्‍डने सणासुदीच्‍या काळात कोल्‍हापूरमध्‍ये पहिल्‍या स्‍टोअरचे उद्घाटन करत आपली रिटेल उपस्थिती वाढवली आहे. व्‍यापक ३३०० चौरस फूट जागेवर असलेल्‍या या नवीन शोरूममध्‍ये डायमंड ज्‍वेलरीमधील ट्रेण्‍डमध्‍ये असलेले कलेक्‍शन्‍स आहेत, ज्‍यामध्‍ये विशेष ७३-मुखी ऑरो क्राऊन स्‍टार या पेटण्‍टेड मास्‍टरपीसचा समावेश आहे. नाविन्‍यपूर्ण डिझाइन, समकालीन इंटीरिअर डेकॉर, आरामदायी आसनव्‍यवस्‍था असे उत्तम संयोजन असण्‍यासह वधूसाठी समर्पित लाऊंज असलेले हे स्‍टोअर बहुमूल्‍य ग्राहकांचा शॉपिंग अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍याप्रती कटिबद्ध आहे, ज्‍यामधून आगामी सीझनसाठी फेस्टिव्‍ह कलेक्‍शन्‍सची व्‍यापक श्रेणी प्रदान करण्‍यात येत आहे.

या स्‍टोअरच्‍या उद्घाटनाबाबत मत व्‍यक्‍त करत ऑराचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. दिपू मेहता म्‍हणाले, ”आम्‍हाला सणासुदीच्‍या काळादरम्‍यान महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर येथे आमचे नवीन स्‍टोअर उद्घाटन करण्‍याचा आनंद होत आहे. संपन्न सांस्‍कृतिक वारसा असलेले महाराष्‍ट्र राज्‍य आम्‍हाला स्‍थानिक समुदायाला ऑराचे सर्वोत्तम हिऱ्यांचे दागिने व अद्वितीय कलाकृती दाखवण्‍याची विशेष संधी देते. आमचे डिझाइन्‍सचे व्‍यापक कलेक्‍शन व अद्वितीय कस्‍टमर केअर राज्‍यातील सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्‍यास सज्‍ज आहेत. या स्‍टोअरच्‍या उद्घाटनामधून ऑराची अपवादात्‍मक सेवा व विविध ऑफरिंग्‍ज प्रदान करण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते, तसेच आमच्‍या सर्व स्‍टोअर्समधील आमचा प्रतिष्ठित वारसा देखील दिसून येतो.” 

ग्राहक सणासुदीच्या काळाचा आनंद घेण्‍यासाठी सज्‍ज असताना ऑराने मंगळसूत्र डिझाइन्‍सची वैविध्‍यपूर्ण श्रेणी सादर केली आहे, ज्‍यामध्‍ये त्‍यांच्‍या फेस्टिव्‍ह कलेक्‍शनमधील विचारपूर्वक डिझाइन केलेल्‍या पारंपारिक व समकालीन स्‍टाइल्‍सचा समावेश आहे. फेस्टिव्‍ह कलेक्‍शन्‍स उत्‍सवादरम्‍यानच्‍या आकांक्षांना पूर्ण करण्‍यासाठी बारकाईने डिझाइन करण्‍यात आले आहेत, ज्‍यामध्‍ये विविधता व स्‍टाइलचे संयोजन आहे, सोबत आकर्षक ऑफर्स देखील आहेत. या काळादरम्‍यान ग्राहकांना स्थिर ईएमआय पेमेंट पर्यायांसह डायमंड ज्वेलरीच्‍या व्‍यापक श्रेणीमधून खरेदी करता येईल, ज्‍यामुळे खरेदीचा अनुभव अधिक लक्षवेधक होईल. 

नवीन शोरूम ऑराच्‍या सर्वोत्तम श्रेणीचा अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. या श्रेणीमध्‍ये प्रतिष्ठित ऑरा क्राऊन स्‍टार कलेक्‍शन, अस्‍त्र कलेक्‍शन, डिझाइर्ड कलेक्‍शन आणि आकर्षक प्‍लॅटिनम कलेक्‍शनचा समावेश आहे. ऑराचा डायमंड वारसा त्‍यांची नाविन्‍यपूर्ण उत्‍पादने आणि वधू व समकालीन आभूषणांच्‍या वैविध्‍यपूर्ण श्रेणीमधून दिसून येतो. टोकियो, हाँगकाँग, अॅण्‍टवर्प, मुंबई व न्‍यूयॉर्क येथे पाच जागतिक डिझाइन केंद्रे असलेल्‍या ऑराने ७०० वर्ष जुनी बेल्जियन कलाकृती परंपरा जपली आहे. 

प्रतिष्ठित ब्रॅण्‍ड १०० टक्‍के प्रमाणित दागिन्‍यांसह कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी विमा व मोफत आजीवन देखभाल सेवा देखील देतो. ऑरा हिऱ्यांसाठी आजीवन एक्‍स्‍चेंज, बायबॅक व सेव्‍हन-डे रिटर्न पॉलिसी देतो. तसेच ब्रॅण्‍ड ६ महिन्‍यांची अपग्रेड सुविधा देतो आणि ब्रॅण्‍डचे सर्व दागिने बीआयएस हॉलमार्क प्रमाणित आहेत. 

या स्‍टोअर उद्घाटन साजरीकरणाचा भाग म्‍हणून ऑरा नवीन स्‍टोअरला भेट देणाऱ्या ग्राहकांना विशेष सुरूवातीच्‍या सूट व स्‍पेशल ऑफर्स देईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …