
no images were found
२६ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन
पनवेल : १४ ते १७ ऑक्टोबर या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुचर्चित नवी मंबई मेट्रो रेल्वेचे उद्घाटन होईल अशी चर्चा होती. मात्र आता २६ ऑक्टोबर ही नवीन तारीख सरकारी प्रशासनाच्या अधिका-यांसमोर आली आहे. २६ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सूरु असलेल्या ठिकाणी महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमासाठी थेट येणार आहेत. याचवेळी ते मेट्रो रेल्वेचे उदघाटन करुन त्यावेळी मेट्रोची सफर करतील असे नियोजन केले जात आहे.अद्याप या नवीन तारखेविषयी सरकारी प्रशासनातील अधिका-यांनी कोणताही दुजोरा दिला नसला तरी खासगीमध्ये अधिकाऱ्यांना या तारखेला निश्चित तारीख समजून नियोजन करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.