no images were found
“नाच गं घुमा’या चित्रपटाच्या निमित्ताने स्वप्नील जोशी पहिल्यांदाच निर्मात्याच्या भूमिकेत
स्त्री हा निसर्गाचा मास्टरपीस आहे… बायकांना जग चालवायला दिले तर युद्ध होणार नाही, फक्त एकमेकांशी न बोलणारे देश असतील…अशा अनेक टिप्पण्या बायकांबद्दल केल्या जातात आणि विशेषणे लावली जातात. नेमक्या याच स्वभाववैशिष्ट्यांवर आधारित, गमती-जमतींवर आधारित, एका अगदी धमाल चित्रपटाची निर्मिती करत आहेत मराठीतील आघाडीचे कलाकार. स्वप्नील जोशीची पहिलीच चित्रपट निर्मिती असलेला ‘नाच गं घुमा’ नावाचा हा चित्रपट लिहिला आहे मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी ह्यांनी आणि दिग्दर्शक आहेत परेश मोकाशी.
‘नाच गं घुमा’ ही ज्येष्ठ लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेली कथा असून महिलांच्या अवतीभवती घडणाऱ्या आणि त्यांच्याशी संबंधित अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी यात गुंफल्या गेल्या आहेत. महिलांच्या संबधातील गोष्टी साकारताना स्त्रीत्त्वाचा एक वेगळा पैलू अलगद समोर येतो आणि तिच्या बुद्धी-भावनेच्या अचूक मिश्रणावर प्रकाश पडतो. या चित्रपटाची आज घोषणा केली गेली आणि त्या निमित्ताने एक छोटेखानी टीझर प्रदर्शित केला गेला. चित्रपट १ मे २०२४ रोजी प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे.
कुलकर्णी यांनी ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी ही संकल्पना ऐकवली नी त्यांना ती खूप आवडली. मोकाशी यांनी सहलेखक म्हणून या संकल्पनेला एक वेगळी उंची दिली. त्यानंतर मग निर्मितीसंबंधी चर्चा झाली तेव्हा, सर्वांनी त्यांचे सर्वकाही पणाला लावायचे ठरवले. परेश मोकाशी, मधुगंधा त्याची फिल्म त्याच्या पैशांनी करणार होतेच पण शर्मिष्ठा राऊत आणि त्यांचे पती तेजस देसाई तसेच स्वप्नील जोशी यांनीही ती जबाबदारी घ्यायची ठरवले.
स्वप्नील जोशी यांनी या चित्रपटाच्या घोषणेच्या निमित्ताने फेसबुकवर लिहिले आहे, “घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर जगातील सर्व सर्व स्त्रियांना त्रिवार वंदन करून घेवून येत आहोत….आमच्या नव्या चित्रपटाची घोषणा…‘नाच गं घुमा’. भेटूया चित्रपटगृहात १ मे २०२४ ला !”