
no images were found
मा. नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर झालेल्या प्रकारा बाबत – भाजपा कोल्हापूरच्या वतीने तीव्र निषेध
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : सोलापूरचे पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर काल शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने छ. शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, चंद्रकांतदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, शाई फेकणाऱ्याचे करायचे काय खाली डोके, वर पाय अशा घोषणा देत काळे झेंडे दाखवत तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, मा. चंद्रकांतदादा पाटील हे रविवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर गेले असता तेथील एका अज्ञात व्यक्ती कडून चंद्रकांतदादा यांच्यावर शाई फेक करण्याचा अमानुष प्रकार करण्यात आला. या घटनेचा भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. त्याच बरोबर ज्या व्यक्ती कडून शाई फेक करण्यात आली आहे, त्या व्यक्तीला सोलापुरातील भाजपाचे कार्यकर्ते चांगलाच धडा शिकवतील यात शंका नाही.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, मा. नामदार चंद्रकांतदादा पाटील हे सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आल्यानंतर भीम आर्मी संघटनेच्या काही पदाधिका-यांनी घोषणाबाजी करत शाई फेकण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेतील नालायक व्यक्तीला शिक्षा हि झालीच पाहिजे. त्याच बरोबर मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर ज्याप्रकारे शाई फेक झाली आहे असे प्रकार यापुढे भारतीय जनता पार्टी खपवून घेणार नाही जशास तसे उत्तर यापुढे दिले जाईल, हे विरोधकांनी लक्षात ठेवले पाहिजे.
यावेळी भाजपा प्र. का सदस्य राहूल चिकोडे, जिल्हा सरचिटणीस संजय सावंत, गायत्री राऊत, नाथाजी पाटील, सचिन तोडकर, रुपाराणी निकम, गिरीष साळोखे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश देसाई, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, अप्पा लाड, माधुरी नकाते, धनश्री तोडकर, जिल्हा चिटणीस विजयसिंह खाडे-पाटील, संतोष भिवटे, रशीद बारगीर, रोहित पोवार, संगीता खाडे, विशाल शिराळकर, माणिक पाटील चियेकर, किरण नकाते, के एन पाटील, विजय आगरवाल, वल्लभ देसाई, अनुप देसाई, अशोक लोहार, हर्षद कुंभोजकर, राजू वडगांवकर, विवेक वोरा, महेश यादव, बंडा साळोखे, दिनेश पसारे, राजसिंह शेळके, सचिन बिरंजे, सुनील पाटील, अवधूत भाट्ये, ऍड पठाण, रोहित कारंडे, नरेंद्र पाटील, सुमित पारखे, राजू नरके,प्रकाश कालेकर, युवराज शिंदे, ओंकार गोसावी, प्रसाद पाटोळे, गौरव सातपुते, अभिजित शिंदे, महादेव बिरंजे, अनिल कामत, सचिन साळोखे, राजगणेश पोळ, प्रितम यादव, प्रवीणचंद्र शिंदे, दिलीप बोन्द्रे, प्रीतम यादव, ओंकार खराडे, विद्या बनछोडे, संध्या तेली, अश्विनी वास्कर, स्वाती कदम, विद्या बागडी ई. पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.