
no images were found
काव्या – एक जज्बा, एक जुनून’ मालिकेत गोविंद पांडे दिसणार गिरीराज प्रधान या प्रभावी भूमिकेत
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘काव्या – एक जज्बा, एक जुनून’ या नवीन मालिकेने सुरू होताच प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. काव्या (सुम्बुल तौकीर खान) या IAS अधिकारी स्त्रीभोवती फिरणारे हे कथानक आहे. देशाची सेवा करून सामान्य जनतेच्या उपयोगी यावे हेच काव्याचे लक्ष्य आहे. या वेधक कथानकात गिरीराज प्रधान या आकर्षक व्यक्तिरेखेची एंट्री झाली आहे, जो आदिराज प्रधान (मिश्कत वर्मा) च्या पित्याची भूमिका करत आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता गोविंद पांडे ही भूमिका साकारत आहे. गिरीराज एक राजकीय वकूब असलेला सरपंच आहे आणि आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तो एक एक पाऊल टाकताना दिसतो. अधिकार आणि स्वबळावर मिळवलेले यश यामुळे त्याचे व्यक्तिमत्व भारदस्त आहे. काव्याशी त्याचा रेल्वे स्टेशनवर सामना होतो आणि ती त्याला आव्हान देते. आणि तो तिला धमकी देत तिला कधीही न विसरण्याचे वचन देतो.
गोविंद पांडे त्याच्या असामान्य प्रतिभेबद्दल आणि पडद्यावर विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याच्या त्याच्या हातोटीबद्दल ओळखला जातो. कलेविषयीची त्याची निष्ठा आणि आपल्या भूमिकेत सखोलता आणि अस्सलपणा आणण्याचे कसब यामुळे टेलिव्हिजन उद्योगात त्याचे नाव आदराने घेतले जाते. आपला आनंद व्यक्त करताना गोविंद पांडे म्हणतो, “‘काव्या – एक जज्बा, एक जुनून’ मालिकेच्या जगात पाऊल ठेवणे ही माझ्यासाठी एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. गिरीराज हा स्वतःची दादागिरी चालवणारा पुरुष आहे, जो एका स्त्रीची कुरघोडी सहन करू शकत नाही. काव्याची त्याच्याशी अलीकडेच गाठ पडली आहे, पण भविष्यात तिला अनेकदा