no images were found
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून देवस्थान समितीस निधी
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) :श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरांकडे माननीय श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांच्या विशेष प्रयत्नातून केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून देवस्थान समितीस निधी मंजूर झाला होता .त्यामधील पहिल्या टप्प्यामध्ये मंदिर परिसरात बॉस कंपनीची साऊंड सिस्टिम बसविण्यात आली होती. आता दुसरा टप्पा मंदिर परिसरामध्ये ८’12 “मापाच्या चार एलइडी स्क्रीन बसवण्यात आले आहेत .सदर स्क्रीन विद्यापीठ वाहन तळ, उत्तर घाटी दरवाजा मंदिर परिसर ,व बिंदू चौक या चार ठिकाणी बसवण्यात आले आहे .या स्क्रीनवर मंदिरातील सदर स्क्रीनचे उद्घाटन 15 /10 /2023 रोजी मा. श्रीमंत छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला .यावेळी माननीय राहुल रेखावार जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि प्रशासकी देवस्थान समिती, सुशांत बनसोडे सचिव देवस्थान समिती, व्यवस्थापक महादेव दिंडे, नियोजन समिती सदस्य संजय पवार व अंकुश निपाणीकर उपस्थित होते.