no images were found
शासकीय, खाजगी कार्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये 16 ऑक्टोबरला साजरा होणार पारंपरिक वेशभूषा दिवस
कोल्हापूर : कोल्हापूरचा दसरा महोत्सव देश विदेशात पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनासह राज्य शासन प्रयत्नशील आहे. नवरात्रोत्सवानिमित्त दिनांक १५ ते २४ ऑक्टोबर २०२३ दरम्यान दसरा महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रीचा दुसरा दिवस सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी कार्यालयांसह शैक्षणिक संस्थांमध्ये “पारंपरिक वेशभूषा दिवस” साजरा करण्यात येणार आहे.
‘कोल्हापूरचा शाही दसरा २०२३’ हा राज्य शासनाने राज्याचा महोत्सव’ म्हणून घोषित केला आहे. या निमित्ताने प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. शिक्षण विभागामार्फत पारंपरिक वेशभुषा दिवस” साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व शासकीय व खाजगी कार्यालयांसह शैक्षणिक संस्थांतील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थ्यांनीही सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी पारंपरिक वेशभूषेत कार्यालय, शाळांमध्ये उपस्थित रहावे. तसेच ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवा दरम्यान विविध उपक्रम, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.