no images were found
नाव बदलून इंडस्ट्री गाजवली, रातोरात झालेली स्टार
मुंबई : बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीने आपल्या करिअरमध्ये एकाहून एक सुपरहिट सिनेमे दिले. इंडस्ट्रीत तिने अनेक मोठ्या कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली. १९७६ मध्ये रातोरात ती स्टार बनली, पण आपल्या प्रेमासाठी तिने करिअर पणाला लावलं. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना इंडस्ट्रीला रामराम केला. या अभिनेत्रींपैकी ज्यांनी ८०च्या दशकातील काळ गाजवला. अभिनेत्रीने सिनेमात येण्याआधी तिचं नावही बदललं होतं. या अभिनेत्री आहेत रिना रॉय. रिना रॉय यांचं आधीचं मूळ नाव सायरा अली होतं. पण त्यांनी मोठी प्रसिद्धी रिना नावानेच मिळाली. आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअरमध्ये त्यांनी १०८ हून अधिक सिनेमात काम केलं आहे.
रिना रॉय यांनी वयाच्या १५व्या वर्षी जरुरत सिनेमातून अभिनय क्षेत्रात करिअरची सुरुवात केली होती. या सिनेमानंतर १९७३ मध्ये आलेल्या जैसे को तैसा सिनेमातून त्या प्रसिद्धीझोतात आल्या. करिअरमध्ये त्यांनी साकारलेल्या ‘जानी दुश्मन’ आणि ‘नागिन’ सारख्या सिनेमातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना आजही ओळखलं जातं. एक काळ असा होता, ज्यावेळी बॉलिवूड सुपरस्टार शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबतच्या अफेअरमुळे त्या चर्चेत आल्या होत्या.
रिना रॉय ७० ते ८० च्या दशकात बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होत्या. १९७२ मध्ये त्यांनी प्रमुख अभिनेत्री म्हणून फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. ७०च्या दशकापासून २००० पर्यंत त्यांनी बॉलिवूडमध्ये मोठी प्रसिद्धी मिळवली आणि एकाएकी अचानक इंडस्ट्री सोडली. त्यांच्याा ३० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी १०८ हून अधिक सिनेमांत काम केल आहे.
रिना लहान असताना त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. दोघांचे मार्ग वेगळे झाल्यानंतर तीन मुलांना त्यांच्या आईनेच वाढवलं. त्यांनी मुलांना स्वत:चं नाव दिलं. त्यामुळे सायरा अली या रिना रॉय झाल्या. सुरुवातीला त्यांचं नाव रुपा ठेवण्यात आलं होतं, पण पहिल्या ‘जरुरत’ सिनेमावेळी सिनेमाच्या निर्मात्यांनी त्यांचं नाव बदलून रुपा बदलून रिना केला.
Bरिना इंडस्ट्रीत असताना त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत असायच्या. त्याशिवाय त्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिना रॉय आपल्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना त्यांनी प्रेमासाठी इंडस्ट्री सोडली. रिना रॉय यांनी करिअरमध्ये पीकवर असताना पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानसोबत लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्यांनी करिअर सोडलं.