Home मनोरंजन फिल्‍ममेकिंग व फोटोग्राफीमधील नेक्‍स्‍ट जनरेशन इनोव्‍हेशन्‍सचे अनावरण

फिल्‍ममेकिंग व फोटोग्राफीमधील नेक्‍स्‍ट जनरेशन इनोव्‍हेशन्‍सचे अनावरण

3 min read
0
0
29

no images were found

फिल्‍ममेकिंग व फोटोग्राफीमधील नेक्‍स्‍ट जनरेशन इनोव्‍हेशन्‍सचे अनावरण

 

     कॅनन इंडिया या डिजिटल इमेजिंग सोल्‍यूशन्‍समधील आघाडीच्‍या कंपनीने आज आपल्‍या ईओएस आर सिरीजमध्‍ये दोन उल्‍लेखनीय उत्‍पादनांचे अनावरण केले:  ईओएस आर 1 आणि  ईओएस आर 5 मार्क II. फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी सेगमेंटमधील अग्रणी कॅनन पुन्‍हा एकदा उद्योगामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यास आणि नेक्‍स्‍ट जनरेशन इंटेलिजण्‍ट वैशिष्‍ट्ये, दर्जा, गती व सोयीसुविधेसह ग्राहकांच्‍या अपेक्षांची पूर्तता करण्‍यास सज्‍ज आहे.

      ईओएस आर 1 आणि  हा कंपनीचा पहिला फ्लॅगशिप ईओएस आर सिस्‍टम कॅमेरा आहे, जो प्रखर शूटिंग स्थितींमध्‍ये देखील सर्वोत्तम क्षणांना कॅप्‍चर करण्‍याची गरज असलेले अॅक्‍शन शैलीतील फोटोग्राफर्स, तसेच मीडिया व व्हिडिओ प्रोडक्‍शन विभागांच्‍या गरजा लक्षात घेत डिझाइन करण्‍यात आला आहे. शक्तिशाली नवीन इमेज प्रोसेसिंग व ऑटोफोकस सिस्‍टम्‍ससह नवीन कॅमेरा नवीन मानक स्‍थापित करत आहे आणि डिजिटल युगामध्‍ये गतीला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहे. 

     ईओएस आर 5 मार्क II हा फुल-फ्रेम मिररलेस कॅमेरा आहे, जो उच्‍च-कार्यक्षम ४५-मेगापिक्‍सल बॅक-इल्‍यूमिनेटेड (बीआय) स्‍टॅक सीएमओएस सेन्‍सर आणि अॅक्‍सेलरेटेड कॅप्‍चर इमेज प्रोसेसर सिस्‍टम अशा उल्‍लेखनीय वैशिष्‍ट्यांसह EOS R5 ला मागे टाकतो. तसेच, या कॅमेऱ्यामध्‍ये आय कंट्रोल एएफ आणि सिनेमा ईओएस वैशिष्‍ट्ये यांसारखी सुधारित वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यामुळे नेक्‍स्‍ट जनरेशनमध्‍ये ईओएस सिस्‍टममधील कॅननच्‍या प्रख्‍यात ‘५ सिरीज’चा समावेश आहे. या कार्यक्षमता ईओएस आर 5 मार्क II  ला फोटो व मूव्‍ही प्रोफेशनल्‍ससाठी ट्रू ऑल-राऊंडर कॅमेरा बनवतात. 

      या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत कॅनन इन्‍क.चे कार्यकारी अधिकारी, कॅनन मार्केटिंग एशियाचे अध्‍यक्ष व सीओओ आणि कॅनन सिंगापूरचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. टायगर इशी म्‍हणाले, ”तंत्रज्ञान प्रगती आणि सर्जनशील नाविन्‍यतेचे डायनॅमिक एपिकसेंटर म्‍हणून भारत कॅननच्‍या जागतिक विकास धोरणासाठी आवश्‍यक हब असल्‍याचे सिद्ध झाले आहे. ही बाजारपेठ आमच्या कॅमेरा व्‍यवसायासाठी अपवादात्‍मकरित्‍या उत्तम कामगिरी करत आहे, तसेच डीआयएलसी विभागामध्‍ये आमचा आघाडीचा जागतिक बाजारपेठ हिस्‍सा स्‍थापित करत आहे. आम्‍ही आमच्‍या ईओएस सिरीजचा वारसा अधिक प्रबळ करण्‍यास उत्‍सुक असताना  ईओएस आर 1 आणि  ईओएस आर 5 मार्क II च्‍या लाँचमधून वापरकर्त्‍यांना सक्षम करण्‍यासाठी अग्रणी अत्‍याधुनिक तंत्रज्ञान सादर करण्‍याप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते. हे नवीन कॅमेरे उत्‍पादनांपेक्षा अधिक आहेत, ते भारतीय चित्रपटनिर्माते व फोटोग्राफी व्‍यावसायिकांकरिता अद्वितीय व्हिज्‍युअल सर्वोत्तमतेच्‍या माध्‍यमातून कथानकाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यासाठी गेटवेज आहेत. भारत आशियामधील अव्‍वल कामगिरी करणारी बाजारपेठ असण्‍यासह मला विश्‍वास आहे की हे लाँच हे वर्ष आमच्‍यासाठी उल्‍लेखनीय ठरण्‍यासाठी मोठे योगदान देईल.” 

     कॅननच्‍या नवीन उत्‍पादनांमागील उद्दीष्‍टाला सांगत कॅनन इंडियाचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. तोशियाकी नोमुरा म्‍हणाले, ”नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या व बहुप्रतिक्षित प्रमुख कॅमेरा ईओएस आर 1  सर्वोत्तम उपयुक्‍तता व विश्‍वासार्हतेसह इमेजिंग तंत्रज्ञानामध्‍ये नवीन स्‍तर सादर करतो, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांच्‍या गरजा व तंत्रज्ञान सुधारणांची पूर्तता होण्‍याची खात्री मिळते. शक्तिशाली नवीन इमेज प्रोसेसिंग आणि ऑटोफोकस सिस्‍टम्‍ससह नवीन कॅमेरा नवीन मानक स्‍थापित करत आहे आणि डिजिटल युगामध्‍ये गतीला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहे.” 

      ते पुढे म्‍हणाले, ”कॅननच्‍या भारतातील वारसामधून, विशेषत: प्रतिष्ठित ईओएस ५डी सिरीजच्‍या माध्‍यमातून नाविन्‍यता व सर्वोत्तमतेप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.  ईओएस आर 5 मार्क II च्‍या लाँचसह आम्‍ही फिल्‍ममेकिंग व फोटोग्राफीच्‍या लँडस्‍केपमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यास, तसेच ‘कालातीत वारसा’च्‍या नवीन युगामध्‍ये प्रवेश करण्‍यास सज्‍ज आहोत. ”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…