Home शासकीय मिठाई, बनावट पनीरवर ‘एफडीए’कडून कारवाई

मिठाई, बनावट पनीरवर ‘एफडीए’कडून कारवाई

1 second read
0
0
104

no images were found

मिठाई, बनावट पनीरवर ‘एफडीए’कडून कारवाई

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने मंचर येथील महावीर डेअरी अँड स्वीट मार्टने अस्वच्छ परिस्थितीत खवा व गुजरात बर्फी साठवल्यामुळे तसेच चाकण येथील दोन मिठाई विक्रेत्यांनी मिठाई ट्रेवर ‘बेस्ट बिफोर’ दिनांक नमूद केले नसल्याने कारवाई केली. मांजरी खुर्द येथील मे. आर. एस. डेअरी फार्म या विनापरवाना व्यवसाय करणार्‍या कारखान्यावर छापा मारून बनावट पनीरचा साठा जप्त केला. एफडीएच्या वतीने महावीर डेअरी अँड स्वीट मार्ट, मंचर या स्वीट मार्टवर छापा टाकला.

गणेश उत्सवाच्या दरम्यान अन्न व औषध प्रशासन पथकाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये अस्वच्छ परिस्थितीत साठविलेला खवा व स्वीट खव्याचे (गुजरात बर्फी) दोन नमुने घेऊन उर्वरित 23 हजार 800 रुपये किमतीचा 119 किलो खवा आणि 5 हजार 600 रुपये किमतीचा 28 किलो स्वीट खवा असा एकूण 29 हजार 400 किमतीचा साठा जप्त केला. मांजरी खुर्दमधील कारखान्यावर छापा टाकून 1 लाख 97 हजार 780 रुपये किमतीचे 899 किलो बनावट पनीर, पनीर बनविण्यासाठी वापरण्यात येणारी 2 लाख 19 हजार 600 रुपये किमतीची 549 किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि 4 हजार 544 रुपये किमतीचे 28.4 किलो आरबीडी पामोलीन तेल असा एकूण 4 लाख 21 हजार 924 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला असून, घेण्यात आलेले नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …