
no images were found
मनसे- शिंदे गट युती होणार? राज ठाकरे आज ‘वर्षा’वर
मुंबई – गणपती दर्शनाच्या निमित्ताने अनेक नेते एकमेकांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेत आहेत. सत्तास्थापना, शह-काटशह या सगळ्याबद्दलची रणनीती यानिमित्ताने आखली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाणार आहेत. त्यामुळे मनसे – शिंदे गट युतीच्या चर्चा रंगत आहेत.
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून तयारी सुरू आहे. यंदा शिवसेना – भाजपा आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ दिसून येत आहे. या निवडणुकांसाठी रणनीती आखण्याची तयारी सुरू आहे. याच संदर्भात मनसेसोबतही जवळीक वाढवण्याचा शिंदे गट आणि भाजपाचा प्रयत्न दिसून येत आहे. अनेक भाजपा नेते राज ठाकरेंची भेट घेत आहेत. राज ठाकरेंना दसरा मेळाव्याला बोलवण्याच्याही चर्चा सुरू आहेत.
गणेशोत्सवाला यंदा राजकीय सत्तानाट्याची किनार आहे.
आज राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शासकीय निवासस्थान वर्षावर जाणार आहेत. यामागचं प्राथमिक कारण जरी गणपतीचं दर्शन असलं तरी त्यामागे शिंदे गटासोबत युतीच्या चर्चांचं तर नियोजन नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिका भाजपा एकटी लढवणार असल्याचीही माहिती मिळत आहे.