no images were found
निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘घड्याळ’ चिन्ह गोठवणार? कायदेतज्ञ उज्ज्वल निकम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूटप्रकरणी शुक्रवारी, ६ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला. तर, बहुसंख्य लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं. आता पुढील सुनावणी सोमवारी, ९ ऑक्टोबरला होणार आहे. पण, पुढील सुनावणीत निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह गोठवू शकते का? यावर कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलं आहे.
“निवडणूक आयोग तडकाफडकी पक्षाचं चिन्ह गोठवू शकत नाही. राज्यात किंवा देशात निवडणुका लागल्या असतील आणि मुदतीपूर्व निर्णय देता येत नसेल, तर निवडणूक आयोग चिन्ह गोठवतं,” असं उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं आहे.