
no images were found
लक्ष्य खुराणा चा क्योंकि… सास माँ, बहू बेटी होती है मालिकेत प्रवेश
‘गुरुदेव भल्ला स्क्रीन्स एलएलपी’ संस्थेची निर्मिती असलेल्या ‘क्योंकि… सास माँ, बहू बेटी होती है’ या नव्या विचारप्रवर्तक मालिकेच्या प्रसारणास ‘झी टीव्ही’ वाहिनीने अलिकडेच सुरुवात केली आहे. धाकट्या जावेच्या ‘सास कभी माँ और बहू कभी बेटी नहीं बन सकती’ या ठाम भूमिकेला खोटी ठरविण्यासाठी मोठी सून अंबिका राजगौर कुटुंबियांच्या मालकीच्या अनाथालयात दाराशी सोडण्यात आलेल्या केसर नावाच्या एका अनाथ मुलीला अंबिका दत्तक घेते. पण ती तिला एक मुलगी म्हणून नव्हे, तर आपले सारे कुटुंब एकत्र राखणारी सून म्हणून वाढविण्याचा निर्णय जाहीर करते.
मालिकेच्या कथानकात आता सूरज राजगौर या व्यक्तिरेखेचा प्रवेश होत असून ही व्यक्तिरेखा लक्ष्य खुराणा या अभिनेत्याने साकारली आहे. मानसी जोशी-रॉय, नाविका कोटिया आणि हिमांशू सोनी या दिग्गज कलाकारांनी प्रेक्षकांना आपल्याशी बांधून ठेवले आहे. मालिकेत लक्ष्य हा अंबिकाचा मुलगा सूरजची भूमिका रंगविणार आहे. सूरज हा एक आदर्श मुलगा आणि उत्तम भागिदार असतो. कोणत्याही महिलेला आपला मुलगा असा व्हावा, असेच वाटते. सूरज हुशार आणि नम्र आहे, दुसर््यांचा आदर करणारा आणि आज्ञाधारक आहे. तो अगदी वक्तशीर असून आपल्यावरील कौटुंबिक जबाबदार््यांची जाणीव असलेला आहे. मात्र क्वचित कधीतरी तो आक्रमक होतो आणि कधी कधी आपला हक्क गाजविण्याचा प्रयत्न करतो. विशेषत: कौटुंबिक नातेसंबंध आणि आपल्या चीजवस्तूंची गोष्ट असेल, तर.
लक्ष्य खुराणा म्हणाला, “क्योंकि… सास माँ, बहू बेटी होती हैच्या कलाकारांबरोबर भूमिका साकारण्यास मी अधीर झालो आहे. मी एका नव्या आणि ताज्यातवान्या भूमिकेच्या शोधात होतो आणि नेमकी त्याच वेळी मला ही भूमिका देऊ करण्यात आली. दैनंदिन मालिकांपेक्षा या मालिकेची संकल्पना आणि कथा अगदी वेगळी आहे, असं मला वाटतं. आपली सूरजची व्यक्तिरेखा साकारण्यास लक्ष्य सिध्द झाला असला, तरी त्याची व्यक्तिरेखा मालिकेत कोणते नाट्य निर्माण करील, ते पाहणे प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरेल.