Home राजकीय मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करावी-हेमंत पाटील

मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करावी-हेमंत पाटील

2 min read
0
0
54

no images were found

मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करावीहेमंत पाटील

 

पुणे :  बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या ‘न्यू टेक रिसायकल प्रोडक्ट’ या कंपनी विरोधात कारवाई करा,अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रादेशिक अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार केला आहे.तक्रारीची दखल घेण्यात आली नाही तर सातारातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू,असे पाटील यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

ज्या भूखंडावर ही कंपनी उभारण्यात आली आहे, ती जमीन बिगरशेतीसाठी नसतांना देखील या कंपनीला परवानगी देण्यात आलीच कशी? असा सवाल देखील पाटील यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे.ज्या अधिकाऱ्यांनी या कंपनीला अभय दिला त्यांच्यावर कारवाईची मागणी देखील पाटील यांनी केली.जिल्हाधिकाऱ्यांना कंपनीविरोधात तीन वेळा निवेदन देवून देखील त्यांनी कारवाई केली नाही.जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या आशीर्वादाने नलगे बंधु बेकायदेशीर रित्या कंपनी चालवत आहेत.देसाई नलगे कुटुंबियांना पाठीशी घालत असल्याने त्यांचे फावत आहेत.मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात लक्ष घालून तात्काळ कारवाई करावी अशी आग्रही मागणी पाटील यांनी केली.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असलेल्या दुधानवाडी परिसरातील गट क्रमांक २ मध्ये ही कंपनी उभारण्यात आली आहे.पंरतु,शेतीचा विनापरवाना औदयोगिक वापर केला जात आहे.त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अगर वेळोवेळी अस्तित्वात आलेल्या कायदयानुसार शेतीचा विनापरवाना औद्योगिक करणाकरीता बेकायदेशीर वापर केल्याबद्दल कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.सदर जागेचे रुपांतर औदयोगिक बिनशेतीमध्ये जोपर्यंत होत नाही,तोपर्यंत सदरची कंपनी बंद करण्याचे आदेश द्यावे,अशी मागणी देखील पाटील यांनी केली आहे.विशेष म्हणजे सदरची कंपनी दुधानवाडी, बनवाडी, अरबवाडी या मुख्य रस्त्यालगत असल्याने ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरून होणार्या अवजड वाहतुकीमुळे रस्ते खराब होत आहेत. ही सर्व वाहतूक बंद करण्याच्या सूचना देण्यात यावात तसेच सदर कंपनीचे दुषित पाणी, हवा प्रदुषणामुळे वन्य प्राणी यांचा निवारा, व आरोग्य धोक्यात आल्याने कंपनीचे  सुर्दशन सूर्यकांत नलगे व सचिन नलगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील पाटील यांनी केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…