Home औद्योगिक स्कोडा ऑटोने व्हिएतनाममध्ये पहिली डीलरशिप केली सुरू

स्कोडा ऑटोने व्हिएतनाममध्ये पहिली डीलरशिप केली सुरू

3 min read
0
0
37

no images were found

स्कोडा ऑटोने व्हिएतनाममध्ये पहिली डीलरशिप केली सुरू

मुंबई, : स्‍कोडा ऑटोने आज व्हिएतनामी बाजारपेठेत प्रवेशासह त्‍यांच्‍या आंतरराष्‍ट्रीयीकरण धोरणामध्‍ये महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या क्षणाला साजरे करण्‍यासाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या इव्‍हेण्‍टमध्‍ये व्हिएतनामी व झेक सरकारसह स्‍कोडाची स्‍थानिक वितरण व उत्‍पादन सहयोगी टीसी ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्‍कोडा ऑटोचा २०३० पर्यंत डिलर नेटवर्कचा ३० सहयोगींपर्यंत विस्‍तार करण्‍याचा आणि ४०,००० युनिट्सहून अधिक वार्षिक विक्री संपादित करण्‍याचा उद्देश आहे. प्रथम कारोक व कोडियक युरोपमध्‍ये आयात करण्‍यात येतील. पुढील वर्षी सुरू होणे नियोजित असलेल्‍या स्‍थानिक सीकेडी उत्‍पादनाचा देश भारतापासून जवळ असल्‍यामुळे समन्‍वयांचा फायदा घेण्‍याचा मनसुबा आहे. स्‍कोडा व्हिएतनामला उदयोन्‍मुख आसियान प्रांतासाठी गेटवे मानते.
       स्‍कोडा ऑटोचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी क्‍लॉस झेलमर म्‍हणाले, ”आम्‍ही व्हिएतनामच्‍या डायनॅमिक अर्थव्‍यवस्‍थेसोबत, तसेच या झपाट्याने विकसित होणा-या बाजारपेठेमधील नवीन ग्राहकवर्गासोबत सहयोग करण्‍यास उत्‍सुक आहोत. आमच्‍या आंतरराष्‍ट्रीयीकरण धोरणाला चालना देण्‍याच्‍या, आसियन प्रांतामध्‍ये आमचा ब्रॅण्‍ड अधिक प्रबळ करण्‍याच्या आणि दोन प्रमुख बाजारपेठा भारत व युरोपमधील संबंध अधिक दृढ करण्‍याच्‍या दिशेने आमचे हे पुढील पाऊल आहे. तयारीदरम्‍यान स्‍पष्‍टपणे निदर्शनास आले आहे की, आमच्‍या लक्षवेधक मॉडेल पोर्टफोलिओचे उत्‍पादन व विक्रीसाठी आमची उत्तम सहयोगी म्‍हणून टीसी ग्रुपचा पाठिंबा आहे. मी सहयोगाने यशस्‍वी भविष्‍याची सुरूवात करण्‍यास उत्‍सुक आहे.”स्‍कोडा ऑटोने सेलि‍ब्रेटरी इव्‍हेण्‍टसह बाजारपेठेतील लाँचला साजरे केले, डिलर नेटवर्क विस्‍तारित करण्‍याची योजना झेक कार उत्‍पादक कंपनीने क्‍वासिनी-निर्मित एसयूव्‍ही मॉडेल सिरीज कारोक व कोडियक सादर केले, जे स्‍थानिक बाजारपेठेत उपलब्‍ध असणारे पहिले मॉडेल्‍स असतील. मध्‍य व दक्षिण व्हिएतनाममध्‍ये अतिरिक्‍त शोरूम्‍स प्रगतीपथावर आहेत. डिलर नेटवर्क २०२५ पर्यंत २० स्‍कोडा डिलरशिप्‍सपर्यंत आणि २०२८ पर्यंत ३० स्‍कोडा डिलरशिप्‍सपर्यंत वाढवण्‍याचे ध्‍येय आहे.

        २०२४ च्‍या दुस-या सहामाहीपासून स्‍कोडा लक्षणीय प्रादेशिक समन्‍वय करणार आहे. त्‍यानंतर सीकेडीमधून (कम्‍प्‍लीटली नॉक्‍ड डाऊन) असेम्‍ब्‍लीसाठी भारतातील पुणे येथील उत्‍पादन केंद्रामधून व्हिएतनामला पहिल्‍या कुशक वेईकल्‍स निर्यात करण्‍यात येतील, तसेच २०२५ मध्‍ये स्‍लाव्हिया निर्यात करण्‍यात येईल. स्‍कोडाची स्‍थानिक सहयोगी टीसी ग्रुपकडून क्‍वांग निन्‍ह प्रोव्‍हीन्‍स येथील व्हिएत हंग इंडस्‍ट्रीयल पार्कमध्‍ये उत्‍पादन केंद्राचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. मार्केट ट्रेण्‍ड्सनुसार उत्‍पादन क्षमता वाढवण्‍याची, तसेच २०२७ नंतर दरवर्षाला जवळपास २७,००० वेईकल्‍स असेम्‍बल करण्‍याची कंपनीची महत्त्वाकांक्षा आहे.                                                       व्हिएतनामधील ऑटोमोटिव्‍ह बाजारपेठ अपवादात्‍मकरित्‍या डायनॅमिक आहे. सध्‍या व्हिएतनाम आग्‍नेय आशियामधील चौथी सर्वात प्रबळ ऑटोमोटिव्‍ह बाजारपेठ आहे. अंदाजे १०० दशलक्ष लोकसंख्येमध्ये प्रति १,००० रहिवासी फक्त ३८ वाहने आहेत आणि अपेक्षित राष्ट्रीय आर्थिक वाढ पाहता व्हिएतनाम प्रदेशात सर्वाधिक विकास क्षमता असलेला देश म्हणून उदयास येत आहे. ब्रॅण्‍डला मध्‍य कालावधीदरम्‍यान ३०,००० युनिट्सच्‍या वार्षिक विक्रीची अपेक्षा आहे, तसेच हा आकडा २०३० नंतर ४०,००० युनिट्सपेक्षा अधिकपर्यंत वाढण्‍याची अपेक्षा आहे. व्हिएत हंग इंडस्‍ट्रीयल पार्क येथे स्थित टीसी ग्रुपच्‍या मालकीच्‍या प्‍लांटची क्षमता भविष्‍यात उत्‍पादनामध्‍ये वाढ करण्‍यासाठी वापरता येऊ शकते, ज्‍यामागे संपूर्ण आसियन प्रांतामध्‍ये स्‍कोडा मॉडेल्‍सची निर्यात वाढवण्‍याचा मनसुबा आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…