
no images were found
स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा अंतर्गत शहरात विविध ठिकाणी स्वच्छता
कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्याकरीता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 1 ऑक्टोंबर 2023 रोजी स्वच्छतेकरीता सर्व नागरीकांनी 1 तास श्रमदान करावे असे आवाहन केले होते. दि.1 ऑक्टोंबर 2023 रोजी स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा (SHS) 2023 अंतर्गत देशभरात स्वच्छता मेगा ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरात सकाळी 10 ते 11 या वेळेत महालक्ष्मी मंदीर परिसर, रेल्वे स्टेशन, टेंबलाई मंदिर परिसर, तोरस्कर चौक मेनरोड, पाडळकर मार्केट परिसर, विकास हायस्कूल रोड, आयटीआय रोड, क्रीडा संकूल रोड, सायबर कॉलेज रोड, यादवनगर, सदरबाजार मेनरोड, शिये फाटा मेन रोड, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर मार्केट रोड, शिरोली जकात नाका ते तावडे हॉटेल मेनरोड, पंचगंगा नदीघाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सकाळी 10 वाजता प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी महालक्ष्मी परिसरात या मोहितमेचा शुभारंभ केला. यानंतर त्यांनी या परिसरात स्वच्छता करुन, रेल्वे स्टेशन, टेंबलाईवाडी येथे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. या मोहिमेत महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचा-यांसह, आयकर विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शहरातील विविध शैक्षणिक संस्था, युवा क्लब, NCC, NSS, नागरिक इत्यादिंना सहभाग नोंदवून शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता केली. त्याचबरोबर विविेकानंद कॉलेज च्या विद्यार्थ्यानी विवेकानंद कॉलेज ते दसरा चौक, मेन राजाराम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मेन राजाराम कॉलेज ते हुतात्मा स्मारक मार्गावरुन रॅली काढून नागरिकांमध्ये जनजागृती केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, मुख्य लेखापरिक्षक मिसाळ, उप-शहर अभियंता रमेश कांबळे, सतिश फप्पे, नगरसचिव सुनील बिद्रे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, मुख्य आरोग्य निरिक्षक सुधाकर चल्लावाड, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, आस्थापना अधीक्षक राम काटकर, वृक्षप्रेमी, रोटरी क्लब, अर्थमुव्हर्स, शाहू सेना,शास्त्रीनगर सिध्दीविनायक हॉस्पिटल चे कर्मचारी, शिवाजी विद्यापीठ डीओटी सेंटरचे विद्यार्थी, आयटीआयचे शिक्षक व विद्यार्थी, पाउळकर मार्केटमधील व्यापारी, बापुंजी साळुंखे इनस्टीटयुट, गोखले कॉलेज, महावीर कॉलेज, कमला कॉलेज, यशवंत भाऊराव पाटील विद्यालय, लक्ष्मीपूरी पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, नानासाहेब धर्माधिकारी संस्थेचे सदस्य, व्हाईट आर्मी, अवनी संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक, महापालिकेचे सर्व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.