no images were found
स्त्रियांनी दैनंदिन जीवनात आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज
– श्वेता पाटील.
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :येथील न्यू वुमन कॉलेज ऑफ फार्मसीमधे मुलींसाठी मानासिक आरोग्य, समस्या व त्यावरील उपाय यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलाने करण्यात आली. सुरुवातीला कॉलेजचे प्रार्चाय. डॉ रविंद्र कुंभार यांनी स्वागत केले व प्रास्ताविकात महिलांचे आरोग्य, समस्या व त्यासाठी लागणारे समुपदेशन याची गरज असल्याचे नमुद केले.
यावेळी उपस्थित असलेल्या बी. केअरच्या सौ श्वेता पाटील यांनी मार्गदर्शन करताना किशोरवयीन मुलींच्या आरोग्य समस्या, स्वच्छतेची गरज , दैनंदिन जीवनशैली, मासिक पाळीचा वेळी घ्यावी लागणारी काळजी, गर्भाशयाशी संबंधित समस्या यावर सखोल मार्गदर्शन केले. यांनतर झालेल्या सर्व सत्रामध्ये उपस्थित विद्यार्थिनींचे शंका निरसन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. दिव्या शिर्के तर पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन सौ पुजश्री पाटील यनी केले.कार्यक्रमास विद्यार्थिनी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. पियूषा नेजदार प्रा. दिव्या शिर्के यांनी विशेष परिश्रम घेतले.