no images were found
स्वच्छता पंधरवडा अतर्गत व महात्मा गांधी जयंती निमित्त महापालिकेच्यावतीने शहरातील उद्यानाची स्वच्छता
कोल्हापूर : दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा – स्वच्छता ही सेवा 2023 हा उपक्रम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत व महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन महापालिकेच्या विविध उद्यानांची आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महापालिकेच्या 53 उद्यानामध्ये संपर्क अधिका-यांमार्फत स्वच्छता मोहिम घेण्यात आली. हि स्वच्छता मोहिम शनिवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत राबविण्यात आली.
यावेळी प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी आपली मुलगी मिनाक्षीसह ताराबाई पार्क उद्यानामध्ये स्वछता केली. तर अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी मुक्त सैनिक उद्यान, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी पद्मावती उद्यान, उप-आयुक्त साधना पाटील यांनी श्रीराम उद्यान, उप-आयुक्त शिल्पा दरेकर यांनी नाना नानी पार्क, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ यांनी स्मृतीवन उद्यान, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील यांनी महावीर उद्यान, शहर अभियंता यांनी नानासो गद्रे उद्यान, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी नाळे कॉलनी, उपशहर अभियंता नारायण भोसले यांनी बेलबाग उद्यान, सहा.अभियंता रावसाहेब चव्हाण यांनी दादासो शिर्के उद्यान, नगरसचिव सुनिल बिद्रे यांनी फुलेवाडी उद्यान, मुख्य आरोग्य निरिक्षक सुधाकर चल्लावाड यांनी ताराबाई उद्यान, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव यांनी वेल्हाळ व शाहू उद्यान, परवाना अधिक्षक राम काटकर यांनी चिमासो उद्यान, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे व जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी यांनी रंकाळा चौपाटी उद्यानामध्ये आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांसह स्वच्छता मोहीम राबवली. तसेच माजी नगरसेवक राहूल माने यांनी त्यांच्या ग्रुपसह स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. याचबरोबर इतर उद्यानामध्येही नेमून दिलेल्या अधिका-यांसह कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिम राबविली.