Home धार्मिक महापालिकेच्या पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद

महापालिकेच्या पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद

57 second read
0
0
27

no images were found

महापालिकेच्या पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद

 

कोल्हापूर :- महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने घरगुती व सार्वजनिक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक करावा असे आवाहन करण्यात आले होते. यासाठी शहरात ठिक ठिकाणी महापालिकेच्यावतीने कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. या उपक्रमाला कोल्हापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सार्वजनिक विसर्जन मिरवणुकी वेळी सार्वजनिक मंडळांनी 160 व घरगुती 963 गणेश मूर्ती या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या ठिकाणी संकलित करुन इराणी खणीमध्ये पर्यावरण पूरक विसर्जीत करण्यात आल्या. महापालिकेला अर्पण केलेल्या व सार्वजनिक मंडळांनी विसर्जित केलेल्या 1014 मोठ्या गणेश मूर्ती व 1078 लहान गणेश मुर्ती अशा एकूण 2092 गणेश मुर्ती इराणी खण येथे पर्यावरण पूरक विसर्जित करण्यात आल्या. महापालिकेच्या मुर्तीअर्पण आवाहनास शहरातील अनेक मंडळांनी प्रतिसाद देवून गणेशमुर्ती अर्पण केल्याबद्दल व विसर्जन मिरवणूक शांततेने पार पाडल्याबद्दल महापालिकेच्यावतीने सर्व सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्ष, प्रतिनिधींचे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आभार व्यक्त केले. हे विसर्जन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी, आरोग्य, सफाई, विद्युत कर्मचारी, वैद्यकीय पथक, व्हाइट आर्मी, महाराष्ट्र रेस्क्यू फोर्स, हमाल, क्रेन चालक यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्वांनी सलग दोन दिवस अहोरात्र काम केले त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार प्रशासकांनी व्यक्त केले.

            विक्रमनगर येथील श्रमिक युवा मित्र मंडळाचा शेवटच्या गणपतीची आरती सकाळी 8.15 वाजता प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते इराणी खन येथे करण्यात आली.

            दरम्यान महापालिकेच्यावतीने अनंत चतुर्दशी निमित्त सार्वजनिक गणेश विर्सजनाचे मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्थांचे अध्यक्षांना पापाची तिकटी येथील मंडपामध्ये प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अधिकारी यांच्या हस्ते मंडळांना श्रीफळ, पान, सुपारी अर्पण करण्यात आले.  तसेच वृक्षारोपणाचे महत्व समजणेकामी सार्वजनिक गणेश मंडळांना झाडांचे रोपे भेट देण्यात आली. पापाची टिकटी येथील स्वागत मंडपात 255 गणेश मंडळांची नोंद झाली आहे. तर हॉकी स्टेडियम येथील पर्यायी मिरवणूक मार्गावरील महापालिकेच्या स्वागत मंडपात 305 गणेश मंडळांची नोंद झाली.

            महापालिकेकडून विसर्जन ठिकाणी व विर्सजन मार्गावर सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची डागडूजी करण्यात आली होती. अतिक्रमण व इतर अडथळे हटविण्यात आले होते. विसर्जन मार्गावर लाकडी व मजबूत बांबुचे व आवश्यकतेनुसार लोखंडी बॅरिकेटस् व वॉच टॉवर उभे करण्यात आले होते. विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली होती. इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरेकेटींग, वॉच टॉवर व पोलिस पेंडल उभे करण्यात आले होते. इराणी खणीसह मिरवणूक मार्गावर 76 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. आरोग्य विभागाकडून विसर्जन स्थळी तातडीने स्वच्छता करण्यात येत होती. याठिकाणी वैद्यकीय पथक नेमण्यात आली होती. अग्निशमन विभागामार्फत विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड असे 50 जवान व महाराष्ट्र रेस्क्यू फोर्स 50 जवान आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गणेश मुर्ती विसर्जनासाठी इराणी खण येथे 10 तराफे व 5 क्रेनची व 374 हमालांची व्यवस्था करण्यात आली होती. हे हमाल ओळखण्यासाठी त्यांना पांढऱ्या रंगाची टोपी व ओळखपत्र देण्यात आले होते. कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक केले होते. मिरवणूक मार्गावरील धोकादायक इमारतीं महापालिकेच्यावतीने उतरविण्यात आल्या व संबंधीत मालकांना नोटीसाही देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर महाद्वार रोडवरील धोकादायक इमारतीच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले होते.

            विसर्जनादरम्यान आरोग्य विभागाकडून विसर्जनाच्या ठिकाणी आलेले 35 मे.टन. 10 डंपरद्वारे गोळा करण्यात आले. गोळा झालेले निर्माल्य उठाव करून खत प्रक्रिया करण्यास पाठविण्यात आले. मिरवणूक मार्गावर व विसर्जनाच्या ठिकाणी चार विभागीय कार्यालयाअंतर्गत पवडी विभागाचे पवडी विभागाचे 225 कर्मचारी, आरोग्य व ड्रेनेज विभागाचे 450 व इतर विभागाचे 400 कर्मचारी,  35 टँम्पो 150 हमालासह, 5 डंपर, 4 ट्रॅक्टर ट्रॉली व 5 जे.सी.बी, 2 पाण्याचे टँकर, 2 रोलर, 2 बुम अशी व्यवस्था करण्यात आली होती.

            यावेळी इराणी खण येथे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उप-आयुक्त साधना पाटील, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, मुख्य व लेखा वित्त अधिकारी सुनिल काटे, मुख्य लेखापरिक्षक मिसाळ शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपहशहर अभियंता नारायण भोसले, एन.एस.पाटील, रमेश कांबळे, सतीश फप्पे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, मुख्य आरोग्य निरिक्षक सुधाकर चल्लावाड, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, वर्कशॉप प्रमुख चेतन शिंदे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, सर्व अधिकारी विद्युत, पवडी व आरोग्य विभागाचे कर्मचारी, अग्निशमन जवान उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…