Home सामाजिक  टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी

 टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी

34 second read
0
0
36

no images were found

 टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी

 

 

कोल्हापूर  : टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स (टाटा एआयएही भारतातील आघाडीची जीवन विमा कंपनी असूनसर्वाधिक एमडीआरटी पात्र सल्लागार असलेली जगातील पाचव्या क्रमांकाची इन्श्युरन्स कंपनी ठरली आहेकंपनीने १ जुलै २०२३ रोजी  एमडीआरटी (मिलियन डॉलर राउंड टेबललीगमध्ये  १९७८ पात्र सल्लागारांची नोंद केली आहेएमडीआरटी पात्र सल्लागार हे या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट समजले जातातजीवन विमा क्षेत्रात त्यांच्याकडे उत्तम ज्ञान आणि त्यात ते कुशल असतातग्राहकांना उत्तम आणि योग्य सल्ला देण्यासाठी त्यांच्याकडे उत्तम माहिती असतेत्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार विमा योजना मिळते.

आणखी एक अभिमानाची गोष्ट ही की एमडीआरटी पात्र महिला सल्लागारांच्या संख्येतही (९३६टाटा एआयए जागतिक पातळीवर नववी कंपनी तर देशात अव्वल कंपनी ठरली आहेकंपनीने पहिल्यांदाच या वर्गात जगातील  पहिल्या दहा कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे.

टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सचे चीफ एजन्सी ऑफिसर अमित दवे म्हणाले कीटाटा एआयए सल्लागारांची जागतिक पातळीवर नोंद झाली आणि त्यांना सन्मान मिळाले हे पाहाणे मी माझे भाग्य मानतो.  टाटा एआयएच्या ग्राहकांंना सल्लागारांचा उत्तम सल्ला मिळावा आणि सर्व पातळीवर त्यांना चांगला अनुभव यावा यावर आमचा भर असतोहे साध्य करण्यासाठी आम्ही आमच्या सल्लागारांना या उद्योग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट ट्रेनिंगविकासासाठी सहाय्य आणि करीअर घडवण्याची संधी देतोसल्लागारांच्या जाळ्यासह आम्ही प्रत्येक भारतीयाला जीवन विम्याचे कवच मिळून त्यांना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गरजा पूर्ण करता याव्या यासाठी काम करत आहोत.

वित्तवर्ष २३ मध्ये महाराष्ट्रात टाटा एआयएने १८,७६७ नव्या ग्राहकांना विमा योजन दिली आहेत्यातून २५७.९ कोटी रुपयांचा एकूण नवा व्यवसाय प्राप्त झाला आहेवित्तवर्ष २३ मध्ये कंपनीने ४६४५ नवीन परवानाधारक सल्लागार राज्यात नेमले आहेत आणि ३० जून २०२३ पर्यंत विमा सल्लागारांची संख्या ८२४२ झाली आहे९५ टक्के सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रमाण कायम ठेवत टाटा एआयए महाराष्ट्रात ग्राहकांना सर्व महत्त्वाच्या उत्तम सेवा देत आहे.

एमडीआरटी ही जगभरातील आघाडीचे जीवन विमा आणि वित्तीय सेवा प्रोफेशनल्सची जागतिक संघटना आहेयामध्ये ७० हून अधिक देशातील  ५०० हून अधिक कंपन्यांमधील प्रोफेशनल्सचा समावेश आहेते सातत्याने त्यांचे व्यावसायिक ज्ञाननितीमत्ता आणि सर्वोत्तम ग्राहक सेवा देतात.

एमडीआरटी पात्र असलेले जगात सर्वोत्तम वित्तीय प्रोफेशन्ल मानले जातातएमडीआरडी सदस्यता दोन विभागात असते – कोर्ट ऑफ द टेबल (सीओटीआणि टॉप ऑफ द टेबल (टीओटी). कोर्ट ऑफ द टेबल सल्लागाराने एमडीआरटीच्या इतर सदस्यांच्या तुलनेत तीनपट अधिक व्यवसाय करणे आवश्यक असतेटॉप ऑफ द टेबल सल्लागारांनी कोर्ट ऑफ द टेबल सदस्यांच्या दुप्पट व्यवसाय करणे गरजेचे असतेटाटा एआयएकडे १०३ कोर्ट ऑफ द टेबल सल्लागार आहेत आणि ३० टॉप ऑफ द टेबल सल्लागार आहेत

 
 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…