Home शासकीय घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज इराणी खण येथील विसर्जन स्थळाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज इराणी खण येथील विसर्जन स्थळाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

16 second read
0
0
45

no images were found

घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज इराणी खण येथील विसर्जन स्थळाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर :- घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. इराणी खण येथे करण्यात येत असलेल्या तयारीची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज दुपारी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उप-आयुक्त साधना पाटील, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

             विसर्जनाच्या कामकाजासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह अधीक्षक, सहा.अधिक्षक व लिपीक संवर्गातील 500 कर्मचा-यांच्या विविध ठिकाणी नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. इराणी खण येथे गणेश मुर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र बसविण्यात आले आहे. चार विभागीय कार्यालयाअंतर्गत पवडी विभागाचे 500 कर्मचारी, शहरात सर्वत्र आरोग्य विभागाचे 1200 कर्मचारी, गणेश मुर्ती संकलनासाठी 152 टँम्पो 374 हमाल, 5 जे.सी.बी., 7 डंपर, 4 टॅक्टर, 4 पाण्याचे टँकर, 2 बुम, 5 ॲम्बुलन्स व 10 तराफे अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षीततेसाठी सर्व साधन सामग्री सह तैनात असणार असून विद्युत विभागाकडून विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्यावतीने विसर्जन ठिकाणांची साफसफाई करण्यासाठी आरोग्य निरीक्षकांच्या 12 टिम तयार करण्यात आल्या आहेत. विर्सजनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असून नागरीकांचे प्रबोधन करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी प्रबोधनात्मक फलकही लावण्यात आलेले आहेत. पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेच्यावतीने शहरात सर्व प्रभागात विविध ठिकाणी 180 गणेश विसर्जन कुंड, निर्माल्य कुंड व मंडळांच्यावतीने काहीलींची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विसर्जन मार्गावरील खराब झालेल्या रस्त्यांचे पॅचवर्कचे कामही पुर्ण करण्यात आले आहे.

      पवडी विभागाकडून नागरिकांनी विसर्जन कुंडामध्ये विर्सजन केलेल्या गणेशमुर्ती एकत्र करुन टॅम्पोमधून वाहतूक करुन इराणी खणीमध्ये विसर्जीत करणेचे व्यवस्था महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच विर्सजन स्थळाजवळील निर्माल्य गोळा करणेचे काम करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने 12 आरोग्य निरिक्षकांच्या नियंत्राखाली त्या त्या प्रभागातील प्रत्येक विसर्जन कुंडाच्या ठिकाणी प्रत्येकी 2 प्रमाणे दोन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने शहरामध्ये विविध ठिकाणी 1200 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संकलित करण्यात आलेले निर्माल्य खत तयार करण्यासाठी चार ठिकाणी व एकटी संस्थेस वाशी येथे खत तयार करण्यासाठी दिले जाणार आहे. या संस्थेच्या महिलांच्याकडून निर्माल्याचे विलगीकरण करुन खत निर्मितीचे काम करण्यात येणार आहे. यासाठी एकटी संस्थेच्या 150 महिला सदस्य  हे काम करणार आहेत. तरी शहरातील नागरिकांनी गणेशमुर्ती व निर्माल्याचे विसर्जन करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

      उपशहर अभियंता एन.एस.पाटील, रमेश कांबळे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, मुख्य आरोग्य निरिक्षक सुधाकर चल्लावाड, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत,  शाखा अभियंता व्ही एन सुरवसे, विद्युत अभियंता अमित दळवी उपस्थित होते

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…