no images were found
विश्वकर्मा योजनेसाठी सराफ संघाची निवड कोल्हापूरसाठी अभिमानास्पद- राजेश राठोड
कोल्हापूर – कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची विश्वकर्मा कल्याण योजनेसाठी झालेली निवड ही संघाबरोबरच कोल्हापूरसाठी अभिमानाचे असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर सराफ व्यापार संघाचे राजेश राठोड यांनी आज केले.
श्री विराट विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी द्वारका (दिल्ली) येथे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे सकाळी उदघाटन केले. त्यानंतर येथे कोल्हापूर सराफ व्यापारी संघात श्री विराट विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे प्राथमिक उदघाटन आणि फॉर्मचे लोकार्पण करण्यात आले.
केंद्र शासनाच्या वतीने राज्यतील सांगली, नाशिक आणि कोल्हापूर या तीन शहरांची निवड यासाठी केली आहे. त्यामध्ये सराफ व्यापारी संघामध्ये याची सुरवात करण्यात आली. सोनार लाभार्थ्यांसाठी नोंदणीची सोय करण्यात आलेली असून या योजनेत ३० लाभार्थ्यांच्या बॅचेस होणार आहेत आणि लवकरच मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण केंद्राचे व पहिल्या बॅचचे उदघाटन होणार आहे. यावेळी जेम ज्वेलरी सेक्टर स्किल कौन्सिलचे वतीने को-ऑर्डिनेटर राजन डांगरे यांनी या योजनेची विस्तृत माहिती दिली.
यावेळी सत्यजित मोहिते, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव प्रीतम ओसवाल, शिवाजी पाटील, पांचाल सोनार समाज बोर्डिंग संस्थेचे अध्यक्ष अनिल पोतदार (हुपरीकर), सुभाष पोतदार (कोगीलकर), दैवज्ञ समाजचे मधुकर पेडणेकर, दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगचे अध्यक्ष विजय घारे, विश्वकर्मा सोनार समाजाचे सचिव अनिश पोतदार, कोल्हापूर सुवर्णकार कारागीर संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेलवलकर, कोल्हापूर सुवर्णकार बहुउद्देशीय संघाचे अध्यक्ष नचिकेत भुर्के, बंगाली सुवर्ण कारागीर संस्थेचे अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक, चांदी मूर्तिकार असोसिएशनचे अध्यक्ष शामराव पाटील तसेच सराफ संघाचे संचालक कुलदीप गायकवाड, किरण गांधी, ललित ओसवाल, कुमार ओसवाल, अशोक ओसवाल, विजयकुमार भोसले, संजय रांगोळे, तेजस धडाम, भैरू ओसवाल, सिद्धार्थ परमार, शीतल पोतदार आदी उपस्थित होते.