no images were found
विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय संघटना राज्य सरचिटणीसपदी डॉ. ए. के. गुप्ता यांची निवड
कोल्हापूर(प्रतिनिधी ) : राज्यातील विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांची बिनविरोध निवड झाली आहे. नाशिकच्या के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ अध्यक्षपदी निवड झाली आहे.
असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अन-एडेड इंजीनियरिंग कॉलेजीस (महा) अर्थात महाराष्ट्रातील विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या असोसिएशनच्या केंद्रीय समिती विश्वस्तांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. अभियांत्रिकी महाविद्यालयांची स्थापना व प्रशासन यांचा प्रदीर्घ अनुभव असलेले डी. वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता यांची सरचिटणीस पदी निवड झाली आहे. डॉ. गुप्ता यांनी विना अनुदानित महाविद्यालयांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
2003 मध्ये या संघटनेची स्थापना झाली असून राज्यातील 249 महाविद्यालये या संघटनेचे सभासद आहेत. गेल्या वीस वर्षापासून राज्यातील विविध अभियांत्रिक महाविद्यालयांचे प्रश्न आणि समस्या शासन दरबारी मांडून त्यांची निरसन संघटनेकडून केले जाते
या निवडीबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी डॉ. ए. के. गुप्ता यांचे अभिनंदन केले आहे.