Home सामाजिक आर आर काबल लिमिटेडचा आयपीओ १३ सप्टेंबर २०२३ रोजी खुला होणार

आर आर काबल लिमिटेडचा आयपीओ १३ सप्टेंबर २०२३ रोजी खुला होणार

17 second read
0
0
31

no images were found

आर आर काबल लिमिटेडचा आयपीओ १३ सप्टेंबर २०२३ रोजी खुला होणार

             आर आर काबल लिमिटेड (“कंपनी”) आपला आयपीओ बुधवार १३ सप्टेंबर २०२३ रोजी खुला करणार आहे.  या आयपीओमध्ये १,८०० मिलियन रुपयांपर्यंतच्या नव्याने जारी करण्यात आलेल्या इक्विटी समभागांचा आणि समभागांची विक्री करू इच्छिणाऱ्या समभागधारकांकडून १,७२,३६,८०८ पर्यंत इक्विटी समभागांच्या विक्रीचा समावेश आहे.  या ऑफरमध्ये १०८ मिलियन रुपयांपर्यंत इक्विटी समभाग कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, महाराष्ट्र यांच्याकडे मुंबईमध्ये सादर करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे, प्रपोर्शनेट आधारे वाटपासाठी उपलब्ध करवून देण्यात येतील.  कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या समभागांसाठी बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रत्येक इक्विटी समभागासाठी ९८ रुपयांची सूट दिली जाईल. कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भागाव्यतिरिक्त ऑफर ही “नेट ऑफर” आहे.

              अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीची तारीख मंगळवार १२ सप्टेंबर २०२३ ठरवण्यात आली आहे. ही ऑफर सबस्क्रिप्शनसाठी बुधवार १३ सप्टेंबर २०२३ खुली होईल आणि शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ रोजी बंद होईल. प्राईस बँड प्रत्येकी ५ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या, प्रत्येक इक्विटी समभागासाठी ९८३ ते १,०३५ रुपये निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी १४ आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास, १४ च्या पटीत समभागांसाठी बोली लावता येईल. नव्याने जारी करण्यात आलेल्या समभागांच्या विक्रीतून जी रक्कम उभी राहील तिचा उपयोग कंपनीने बँका आणि आर्थिक संस्थांकडून घेतलेल्या जवळपास १,३६० मिलियन रुपयांच्या कर्जाची संपूर्ण किंवा अंशतः परतफेड किंवा मुदतपूर्व परतफेड करण्यासाठी केला जाईल आणि उरलेली रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी वापरली जाईल.

               विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये महेंद्रकुमार रामेश्वरलाल काबरा यांच्याकडून ७,५४,४१७ पर्यंत; हेमंत महेंद्रकुमार काबरा यांच्याकडून ७,५४,४१७ पर्यंत; सुमीत महेंद्रकुमार काबरा यांच्याकडून ७,५४,४१७ पर्यंत; काबल बिल्डकॉन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ७,०७,२०० पर्यंत; राम रत्न वायर्स लिमिटेडकडून १३,६४,४८० पर्यंत आणि टीपीजी एशिया VII एसएफ पीटीई लिमिटेडकडून १,२९,०१,८७७ पर्यंत इक्विटी समभागांचा समावेश आहे. (समभाग विक्री करू इच्छिणारे गुंतवणूकदार) हे इक्विटी समभाग आरएचपीमार्फत सादर केले जात आहेत आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत. ऑफरच्या उद्देशासाठी बीएसई हे नियुक्त स्टॉक एक्स्चेंज आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे  

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे   …