no images were found
‘ओळख जुना बुधवार पेठेची’ पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन
‘कोल्हापूर: ( प्रतिनिधि) ओळख जुना बुधवार पेठेची या पुस्तकाचे प्रकाशन शााहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.००वा अभिषेक लॉन हॉल, ब्रह्ममपुरी येथे होणार आहे. अशी माहिती या पुस्तकाचे लेखन प्रा. दिनेश डांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार श्रीमती जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार सुरेश साळोखे, माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे व तालमीचे अध्यक्ष रणजीत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
बावीसशेहे वर्षांचा सांस्कृतिक वारसा असलेल्या ब्रह्मपुरीच्या भूभागावर वसलेली जुना बुधवार पेठ ही कोल्हापूर शहराची मूळ व सुरुवातीची वस्ती होय. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन धर्मीय व अठरा पगड जातींची राष्ट्रीय एकात्मता जपणारी ही पेठ होय.या पुस्तकाचे लेखन व संपादन प्रा. दिनेश डांगे यांनी केले असून प्रविण हुबाळे, राधिका वरेकर, श्रीधर निकम, सत्यजीत आवटे, विराज पाटील व कै. प्रकाश शिंदे यांनी २०१०ते १३ या तीन वर्षांत केलेल्या अथक प्रयत्नातून पुस्तक साकारले. २०१३ मध्ये जुना बुधवार तालमीच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या वेळी पुस्तक प्रकाशित होणार होते. परंतु काही अडचणींमुळे ते १३ सप्टेंबर २०२३रोजी हे प्रकाशित होत आहे.
पुस्तक निर्मितीचा उद्देश्य : अतिशय शुद्ध होता. आपल्या भागाची आपल्या भागातील लोकांना ओळख व्हावी शहरवासियांच्या मनात पेठेबद्दल वास्तव माहिती मांडावी हा उद्देश्य होता. कोणाबद्दलही आवेश किंवा आकस न बाळगता ‘जे जे उदात्त ते ते समोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुस्तकात एकूण नऊ अध्याय आहेतडांगे म्हणाले पुस्तकाच्या प्रकाशनाने अशी थोर माणसे आपल्या पेठेत होती? अरे अशी कर्तबगार युवा पिढी आपल्या पेठेत आहे? … तर मग आपणही आपल्या पेठेचे पाईक होऊया, असा भाव प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल.शहरवासियांच्या मनात पेठेबद्दल आदराचा भाव निर्माण होईल प्रत्येक पेठ आपली ओळख पुस्तक रूपाने मांडण्यास प्रवृत्त होईल.
यावेळी प्रवीण हुबळे, श्रीधर निकम, विराज पाटील, राधिका फराकटे, संग्राम पाटील, सुनील शिंदे, सुशील भांदिगरे, रणजित शिंदे, संतोष दिंडे, रवींद्र सावंत व राजू माने आदी उपस्थित होते.