no images were found
‘इस्रो’चे उपसंचालक डॉ. शर्मा सोमवारी विद्यापीठात
कोल्हापूर : भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) उपसंचालक डॉ. एस.व्ही. शर्मा आणि शास्त्रज्ञ डॉ. आर. श्रीविध्या या दोन वरिष्ठ शास्त्रज्ञांची येत्या सोमवारी (दि. ११) शिवाजी विद्यापीठात विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागांतर्गत ‘मीट दि सायंटिस्ट’ हा उपक्रम नियमितपणे आयोजित केला जातो. या अंतर्गत येत्या सोमवारी सकाळी ११.३० वाजता इस्रोचे उपसंचालक डॉ. एस.व्ही. शर्मा यांचे ‘चांद्रयान-३’ या विषयावर आणि दुपारी १२.३० वाजता इस्रोच्या शास्त्रज्ञ डॉ. आर. श्रीविध्या यांचे ‘आदित्य एल-१’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी, जिज्ञासू विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिविभाग प्रमुख डॉ. केशव राजपुरे यांनी केले आहे.