no images were found
जिल्ह्यातील वजन माप उपयोगकर्ते आस्थापनांचेवैध मापन शास्त्र विभागाकडून सर्वेक्षण
कोल्हापूर : राज्यातील सर्व वजन मापन उपयोगकर्त्यांना कायद्याच्या कार्यकक्षेत आणण्यासाठी सर्व वजन माप उपयोगकर्ते आस्थापनाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व वजन माप उपयोगकर्ते आस्थापनांच्या सर्वेक्षणाचे काम वैध मापन शास्त्र यंत्रणेने हाती घेतले आहे. सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील कामकाज वैध दुरुस्तीकार परवानाधारकांमार्फत करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाचे कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय व सुरळीतपणे पार पडण्यासाठी सर्व वैध दुरुस्तीकार परवानाधारकांना प्राधिकार पत्रे देण्यात आलेली आहेत. या सर्वेक्षणामध्ये प्राधिकृत दुरुस्ती परवानाधारक त्यांना पुरविण्यात आलेल्या विहित नमुन्यात संबंधित वजन माप उपयोगकर्ते / आस्थापना यांच्या जबाबदार व्यक्तींकडून माहिती संकलित करण्यात येणार असल्याचे वैध मापन शास्त्र विभागाचे उप नियंत्रक द. प्र. पवार यांनी कळविले आहे.
वैध मापन शास्त्र अधिनियम 2009 च्या तरतूदीनुसार कोणत्याही व्यवहारात किंवा सुरक्षेकरता कोणतेही वजन वा माप तसेच तोलन व मापन उपकरणाचा वापर करण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीने ते वापरापूर्वी वैध मापन शास्त्र विभागाकडून पडताळणी व मुद्रांकन करुन घेणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील सर्व व्यापारी व औद्योगिक आस्थापना, कारखाना व वजन मापांचा उपयोग आपल्या व्यवसायात व्यवहार किंवा सुरक्षेसाठी करणाऱ्या व्यक्तींनी सर्वेक्षणाच्या कामकाजात परवानाधारकांना सहकार्य करावे. उपयोगकर्ते यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या दुरुस्तीकार यांना वजन मापांची अचूक माहिती पुरवावी या सर्वेक्षणासाठी कोणत्याही मोबदल्याची आवश्यकता नाही.
0000000