no images were found
माध्यमिक शाळा, महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करा – समाधान शेंडगे
कोल्हापूर :- जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांना निवडणूक व मतदार नोंदणी प्रक्रियेत सक्रीय सहभागी करुन घेण्याच्या हेतुने जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब (ELC) व निवडणूक साक्षरता समिती स्थापन करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. विद्यार्थ्यांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग या विषयावर बैठक झाली. या बैठकीत निवडणूक साक्षरता समितीची रचना व तिचे कार्य याबाबत श्री. शेंडगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
बैठकीस करवीरचे उपविभागीय अधिकारी हरीष धार्मिक, राधानगरीचे उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, नायब तहसिलदार आशा होळकर व जयंत गुरव, प्राचार्य, नोडल अधिकारी, बीएलओ, साफ फौंडेशनचे अध्यक्ष स्वप्निल पवार आदी उपस्थित होते.