Home सामाजिक १४ दिवसांनी नेमकं काय होणार?चांद्रयान ३ पृथ्वीवर परतणार का?

१४ दिवसांनी नेमकं काय होणार?चांद्रयान ३ पृथ्वीवर परतणार का?

0 second read
0
0
25

no images were found

१४ दिवसांनी नेमकं काय होणार?चांद्रयान ३ पृथ्वीवर परतणार का?

१४ दिवस विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे काम करणार आहेत. कारण तोपर्यंत तिथे उन असणार आहे. १४ दिवसांनी मात्र या ठिकाणी अंधार होईल. अंधार झाल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर या दोहोंचं काम थांबणार आहे. चंद्रावर जेव्हा परत सूर्य उगवेल त्यावेळी या दोन्हीचं काम पुन्हा सुरु होऊ शकतं. तसं घडलं तर भारतासाठी ती देखील आनंदाची बातमी ठरणार आहे.
चांद्रयान ३ पृथ्वीवर १४ दिवसांनी परत येणार का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे दोन्हीही चंद्रावरच राहणार आहेत.
चांद्रयान ३ चं सॉफ्ट लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर झालं आहे. इस्रोने चांद्रयान ३ कुठे उतरणार आहे त्याचा फोटो आधीच ट्वीट केला होता. बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आहे.प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरच्या बाहेर आल्याचं ट्वीट इस्रोनेच काही वेळापूर्वी केलं आहे. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाची रासायनिक रचना कशी आहे ते तपासणार आहे. चंद्राची माती आणि खडक यांचं परीक्षणही करणार आहे. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा पहिला देश ठरला आहे. त्यामुळे विक्रम लँडरमधून बाहेर आलेलं प्रज्ञान रोव्हर जो अभ्यास आणि निरीक्षण करेल ते संपूर्ण जगासाठी महत्त्वाचं असणार आहे

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…