
no images were found
‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियान
कोल्हापूर : दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगाच्या दारी’अभियानांतर्गत शुक्रवार दि. 25 ऑगस्ट 2023 रोजी महासैनिक दरबार सभागृह, लाईन बाजार रोड, कसबा बावडा येथे सकाळी 11 वाजता शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सकाळी 10 वाजता दिव्यांगांची नोंदणी करण्यात येणार आहे. या अभियानासाठी दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक आमदार बच्चु कडू तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा स्तरावर शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या शिबीरात दिव्यांग व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील व जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.