Home क्राईम गुंडांच्या टोळीबाबत  पुणे पोलीस चांगलेच आक्रमक

गुंडांच्या टोळीबाबत  पुणे पोलीस चांगलेच आक्रमक

3 second read
0
0
37

no images were found

 गुंडांच्या टोळीबाबत  पुणे पोलीस चांगलेच आक्रमक

 

 

पुणे : दहशत माजवणाऱ्या टोळींची धिंड काढली जात आहे. यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशत बसत आहे. आता पुणे शहरातील विमाननगर भागात दहशत माजविणाऱ्या टोळीवर पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. या टोळीवर मकोका लावला आहे.पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. कोयता टोळी च्या कारवाई अधूनमधून सुरु असतात. चोरी, दरोडे आणि हल्ल्यांच्या घटनाही वाढल्या आहेत. यामुळे पुणे पोलीस चांगलेच आक्रमक झाले आहे. पुणे शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे.

प्रसाद गायकवाड यांच्या टोळीतील आरोपी दहशत निर्माण करत होते. विमाननगर भागात एका विक्रेत्याला धमकावून त्यांनी लुटले होते. पोलिसांच्या रेकॉर्डवर त्यांच्यावर दरोडा, तोडफोड, दहशत माजवणे, शस्त्रे बाळगणे हे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे गुन्हे कमी झाले नव्हते. यामुळे आता थेट मकोका लावण्यात आला आहे.

विमानतळ पोलिस ठाण्याचे पीआय विलास सोंडे यांनी या टोळीवर मकोका लावण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यांनी दिलेल्या प्रस्तावाची पडताळणी झाल्यानंतर मकोकाची कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी दिले. आरोपींवर यापुढेही धडक कारवाई सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विमाननगर भागात प्रसाद गायकवाड यांची गुंड टोळी सक्रीय होती. या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये म्हणजेच मकोका लावण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहेत. या टोळीमधील प्रसाद संपत गायकवाड (वय 25, वडगाव शेरी, पुणे), अरबाज अयुब पटेल (वय 24 येरवडा, पुणे), बबलू संतोष गायकवाड (वय 22 ,विमाननगर,पुणे) यांना मकोका लावला आहे. रितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यानंतर 52 गुंड टोळ्यांविरुद्ध मकोका लावला आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…