no images were found
इचलकरंजी पाणी योजनेसाठी मंत्रालयात बैठक; बंद मागे
कोल्हापूर (प्रतिनिधी): इचलकरंजी महापालीकेसाठी शासनाने मंजूर केलेल्या सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी योजना कार्यान्वित करणे संदर्भात अखेर इचलकरंजी आणि कागलचे नेते एकत्रित येण्याचा मार्ग सोमवारी निश्चित झाला आहे. अर्थात त्यासाठी २० दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ सप्टेंबर रोजी मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. आंदोलनाऐवजी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
इचलकरंजी शहरासाठी अमृत अभियानांतर्गत सुळकूड उद्भव दुधगंगा योजनेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूरी दिली. परंतु या योजनेला कागल आणि शिरोळ तालुक्यातील दुधगंगा काठावरील ग्रामस्थांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी इचलकरंजीला पाण्याचा एक थेंबही देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ही योजना सुरु होण्यापूर्वीच वादाच्या भोवर्यात अडकली आहे.