
no images were found
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. माजी सैनिकांनी संबंधित कार्याबद्दलची प्रमाणपत्रे, गुणपत्रे, सैन्य सेवा पुस्तक, ओळखपत्र या कागदपत्रांसह अर्ज दिनांक १५ सप्टेंबर २०२३ पुर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल माने (निवृत्त) यांनी केले आहे.
विविध क्षेत्रांमध्ये, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळांतील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नृत्य, वादन इ. क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळवणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर/जळीत दरोडा/ अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये इयत्ता १० वी तसेच १२ वी च्या परीक्षेमध्ये ९० टक्क्यांहून जास्त गुण मिळवून उत्तीर्ण माजी सैनिक, विधवांचे पाल्य, पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेमध्ये विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना त्यांच्या कार्याबद्दल धनराशी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
अधिक माहितीकरिता (दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६६५८१२) वर संपर्क साधावा, असेही श्री. माने यांनी कळविले आहे.