
no images were found
माजी सैनिकांच्या पाल्यांनी एअर मार्शल व्ही. ए. पाटकर पुरस्कारासाठी अर्ज करावेत
कोल्हापूर : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी व १२ वी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवांच्या एका पाल्याची निवड एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी करण्यात येणार आहे. सैनिकांच्या पात्र पाल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडील उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यात अर्ज दिनांक १५ सप्टेंबर २०२३ पुर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल माने (निवृत्त) यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी (दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६६५८१२) वर संपर्क साधावा, असेही श्री. माने यांनी कळविले आहे.