no images were found
डॉ. नानासाहेब थोरात यांचे शुक्रवारी विशेष व्याख्यान
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक व शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. नानासाहेब थोरात यांचे येत्या शुक्रवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठात विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. नानासाहेब थोरात हे इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाचे मेरी क्युरी फेलो असून कोविडवरील लस संशोधनाची महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या चमूचे सदस्य आहेत. येत्या शुक्रवारी विद्यापीठाच्या ‘मीट द सायंटिस्ट’ या उपक्रमांतर्गत त्यांचे ‘आंतरविद्याशाखीय संशोधनातील संधी, उपयोजन व जागतिक संधी’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले आहे. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित असतील. या व्याख्यानाचा विद्यार्थी, संशोधक यांच्यासह पालक व शिक्षकांनीही उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय कक्षाचे समन्वयक डॉ. एस.बी. सादळे यांनी केले आहे.