Home राजकीय मानेवर तलवार धरली तरी मी मंत्रिपद स्विकारणार नाही- बच्चू कडू

मानेवर तलवार धरली तरी मी मंत्रिपद स्विकारणार नाही- बच्चू कडू

2 second read
0
0
64

no images were found

मानेवर तलवार धरली तरी मी मंत्रिपद स्विकारणार नाही- बच्चू कडू

नागपूर : पण तिथे फक्त मंत्र्यांनाच बोलावलं आहे, असं वाटतं. मला तरी या स्नेहभोजनाचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही, असं बच्चू कडू यांनी सांगितलं

  शिवसेनेच्या आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी डिनरसाठी आमंत्रित केलं आहे. मात्र यात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना मात्र निमंत्रण देण्यात आलेलं नाही.

मंत्रिमंडळ विस्तारावर आपण कठोर भूमिका घेतलीत. त्यामुळे आपल्याला बोलावलं नसावं, असं वाटतं का असं विचारण्यात आलं. तेव्हा एवढ्या हलक्या कानाचे लोक सध्या सरकारमध्ये नाहीत. त्यामुळे तसा काही विषय असावा असं नाही, असं बच्चू कडू म्हणालेत.मंत्रिपदाच्या दर्जाचं पद माझ्याकडं आहे. पण ते मंत्रिपद नाही. त्यामुळे मला बोलावलं नसावं, असं बच्चू कडू म्हणाले.

मंत्रिपदाबाबतही त्यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. माझ्या छातीवर तलवार ठेवली तरी मी मंत्रिपद स्विकारणार नाही. तशी परिस्थिती आल्यास राजकुमार पटेल यांना आम्ही मंत्री करू, असं बच्चू कडू म्हणालेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…