
no images were found
दूर शिक्षणची एमबीए डिस्टन्सची उद्या फेर प्रवेश
कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठातील दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची एम.बी.ए.डिस्टन्स अभ्यासक्रमाची फेर प्रवेश परीक्षा उद्या रविवार दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभाग येथे संपन्न होणार आहे .या परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश पूर्व अर्ज सादर केला आहे अश्यांनी सकाळी ११.३० वाजता उपस्थित राहून रिपोर्टिंग करायचे आहे. परीक्षेसाठी येताना विद्यार्थ्यांनी हॉलतिकीट अथवा अर्जाची व प्रवेश शुल्काची प्रत,काळा बॉलपेन व एखादा शासकीय ओळखीचा पुरावा सोबत बाळगणे आवश्यक असल्याचे संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी सांगितले आहे.