no images were found
भाग्यलक्ष्मी’ने पूर्ण केली दोन वर्षे; ऐश्वर्या खरे आणि रोहित सुचांतीने चाहत्यांचे मानले आभार
प्रसारणास प्रारंभ झाल्यापासूनच ‘झी टीव्ही’वरील ‘भाग्यलक्ष्मी’ ही मालिका नेहमीच चांगल्या कारणांसाठी चर्चेत राहिली आहे. मालिकेतील ऐश्वर्या खरे आणि रोहित सुचांती या प्रमुख कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले असून #RishMi ही नावे आता घरोघरी पोहोचली असून त्यांचा स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. मात्र मालिकेच्या कथानकाला मिळणार््या नाट्यपूर्ण कलाटण्यांमुळे प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्कंठा अजूनही कायम राहिली आहे. अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की लक्ष्मीचे लग्न विक्रांतशी (मोहित मल्होत्रा) जवळपास होत असते आणि रिषी हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
मालिकेच्या चाहत्यांकडून मिळणार््या उदंड प्रेमामुळे मालिकेचे कलाकार आणि कर्मचार््यांनी या मालिकेच्या प्रसारणाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली, तो टप्पा साजरा केला. म्हणूनच ऐश्वर्या खरे आणि रोहित सुचांती यांनी आपल्या सामाजिक माध्यमांच्या हॅण्डलवरून आपल्या चाहत्यांचे मनापासून आभार मानले. त्यांच्या चाहत्यांनीही त्यांच्याबद्दल प्रशंसेची भाष्ये केली आहेत.
ऐश्वर्या खरे म्हणाली, “गेली दोन वर्षं भाग्यलक्ष्मी मालिकेवर भारतातूनच नव्हे, तर जगभरातून प्रेमाचा वर्षाव होत आहे. अशा या सुंदर मालिकेचा मी एक भाग आहे, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. आमच्या चाहत्यांनी आमच्यावर इतकं भरभरून प्रेम केलं आहे की त्यामुळेच आम्हाला दरवेळी 100 टक्के कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. आमचे प्रेक्षक यापुढेही आमच्या मालिकेवर असंच उदंड प्रेम करतील, अशी मी आशा करते.”
रोहित सुचांती म्हणाला, “भाग्यलक्ष्मीची गेली दोन वर्षं ही खरोखरच स्वप्नवत होती. आमच्या प्रेक्षकांनी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. या मालिकेबद्दल पहिल्यापासूनच माझं मत हे फार चांगलं आणि ठाम होतं. पण प्रेक्षकांचं इतकं प्रेम लाभेल, अशी माझी अपेक्षा नव्हती. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मालिकेला दोन वर्षं झाली ही गोष्ट खरोखरच फार मोठी आहे. पण यापुढेही असे अनेक महत्त्वाचे टप्पे येतील.”
मालिकेने दोन वर्षे पूर्ण केल्याची कामगिरी ऐश्वर्या आणि रोहित हे साजरी करीत असले, तरी लक्ष्मीला विक्रांतशी लग्न करण्यापासून रिषी थांबवू शकतो का, हे पाहणे प्रेक्षकांसाठी निश्चितच उत्कंठावर्धक ठरेल.