Home मनोरंजन करिश्मा कपूर आणि सोनाली बेंद्रे ला आठवले  ‘हम साथ साथ हैं’ च्या शूटचे दिवस 

करिश्मा कपूर आणि सोनाली बेंद्रे ला आठवले  ‘हम साथ साथ हैं’ च्या शूटचे दिवस 

3 min read
0
0
39

no images were found

करिश्मा कपूर आणि सोनाली बेंद्रे ला आठवले  ‘हम साथ साथ हैं च्या शूटचे दिवस 

 

या वीकएंडला, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनीवरील, ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ च्या आकर्षक परफॉर्मन्स आणि हृदयस्पर्शी क्षणांनी भरलेल्या दोन मनोरंजक भागांसाठी तयार व्हा. ‘अंदाज अनदेखा’ या विशेष भागात, सोनाली बेंद्रे आणि गीता कपूर या आदरणीय परीक्षकांना प्रभावित करण्यासाठी आपल्या डान्समध्ये प्रॉप वापरुन स्पर्धक आपले विलक्षण नृत्याविष्कार सादर करतील. 

जुन्या आठवणींना उजाळा देताना सोनाली बेंद्रे आणि करिश्मा कपूर त्यांच्या ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या शूटिंगचे अनुभव सांगतील. सोनालीच्या गमतीशीर गोष्टी आणि आपल्या मैत्रीबद्दल सांगताना करिश्मा म्हणाली, “आम्हाला ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या दिवसांची खरोखर खूप आठवण येते, त्याच्याशी अनेक चांगल्या आठवणी निगडीत आहेत. सेटवर सोनाली अतिशय शांत असायची तर मी मुलाखाची बडबडी! सोनाली शांतपणे तिचे पुस्तक घेऊन वाचत बसायची तर तब्बू आणि मला नेहमी आश्चर्य वाटायचे आणि ‘ती काय वाचत आहे?, ती आमच्याशी का बोलत नाही?, त्या पुस्तकात काय आहे? असे प्रश्न पडायचे. तब्बू आणि मी चित्रपटांबद्दल चर्चा करायचो आणि आता आम्ही कुठल्या गाण्याचे शूटिंग करणार आहोत इ. बोलायचो, सोनाली मात्र एका कोपर्‍यात तिच्या पुस्तकांमध्ये हरवून गेलेली असायची. आम्ही तिच्याकडे जाऊन तिला आमच्यासोबत लंचला बोलवायचो आणि ती सांगायची, ‘मी शाकाहारी आहे आणि मी फक्त सॅलड खाईन. तेव्हा मी म्हणायचे, ठीक आहे, पण ‘आ जाओ सॅलड लेकर’.”सोनाली बेंद्रे सांगते,“‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाचा प्रवास विलक्षण होता आणि आम्ही इतके सगळेजण नेहमीच एका मोठ्या कुटुंबासारखे एकत्र असायचो. एकत्र बसून खाण्याचा आनंद घेण्याची आठवण ही माझ्यासाठी सगळ्यात संस्मरणीय आठवण आहे. करिश्मा अतिशय खट्याळ होती. मला आठवते आहे की ‘एबीसीडीआय लव्ह यू’ या गाण्याच्या शूटिंग दरम्यान सगळ्या दृश्यांमध्ये करिश्मा नव्हती. एरवी, आम्ही बहुतेक वेळा एकत्रच असायचो, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना तिची खूप आठवण यायची. त्या चित्रपटात काम करणे खूप आनंददायी होते.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.     

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.       …