Home मनोरंजन कीर्ती नागपुरे सेटवर फावल्या वेळेत काय करते?

कीर्ती नागपुरे सेटवर फावल्या वेळेत काय करते?

4 second read
0
0
32

no images were found

कीर्ती नागपुरे सेटवर फावल्या वेळेत काय करते?

‘झी टीव्ही’ वाहिनीवरील ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’ ही मालिका प्रसारणास प्रारंभ झाल्यापासून प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या प्रेमकथेचे कथानक आजच्या काळातील वृंदावनमध्ये घडते. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना चांगलेच गुंतवून ठेवले असून त्यातील मोहन (शब्बीर अहलुवालिया), राधा (निहारिका रॉय) आणि दामिनी (संभाबना मोहन्ती) यासारख्या वास्तववादी व्यक्तिरेखांमुळे मालिकेबद्दलची उत्कंठा कायम राहिली आहे. अलिकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की मोहनने त्याला राधाबद्दल वाटणार्‍्या प्रेमाचा स्वीकार केला आहे आणि तो आपली ही भावना तिच्यासमोर लवकरच व्यक्त करण्यास तयार झाला आहे. मात्र मोहनची दिवंगत पत्नी तुलसीच्या (कीर्ती नागपुरे) खुनाच्या आरोपाखाली दामिनी राधाला अटक करवून आपला कुटिल हेतू यशस्वी करते.

सेटवर सतत चित्रीकरण सुरू असले, तरी अधूनमधून कलाकारांना मोकळा वेळ मिळतो आणि तेव्हा ते आपले छंद जोपासतात. लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती नागपुरेला वाचनाची आणि चित्रकलेची खूप आवड आहे. त्यामुळे ती घरी आणि सेटवरही आपल्या या दोन्ही छंदांना जोपासण्यासाठी वेळ काढते. सेटवर ती चित्रीकरणात व्यग्र असली, तरी मध्ये मिळणार्‍्या ब्रेकमध्ये ती आपली वाचनाची आवड जोपासते. तर तिने आपल्या मेक-अप रूमचे रुपांतर आपल्या चित्रकलेच्या स्टुडिओत केले आहे. अशा प्रकारे चार भिंतींच्या आत आणि बाहेरही मनाला विरंगुळा देणे हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असते. वैयक्तिक छंदांचे महत्त्व कीर्तीला निश्चितच ठाऊक आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.     

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.       …