no images were found
काव्या – एक जज्बा, एक जुनून’च्या फर्स्ट लुकमध्ये एका करारी, दमदार रूपातील सुंबुल तौकीर खानने प्रेक्षकांना केले थक्क
स्त्रिया आणि आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची त्यांची जिद्द यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या मालिका सादर करण्यात सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन या वाहिनीचे नाव अग्रेसर आहे. ही वाहिनी आता घेऊन येत आहे एका IAS अधिकाऱ्याची प्रेरणादायक कथा- ‘काव्या – एक जज्बा, एक जुनून’. ही मालिका एका सशक्त स्त्री-व्यक्तिरेखेभोवती फिरते. ही मध्यवर्ती भूमिका केली आहे, सुंबुल तौकीर खान या अष्टपैलू अभिनेत्रीने.
या मालिकेच्या फर्स्ट लुकमध्ये दृढनिश्चयी आणि दमदार रूपातील सुंबुल तौकीर खानने प्रेक्षकांना चकित केले आहे. ती काव्या नामक एक अत्यंत प्रेरणादायक व्यक्तिरेखा साकारत आहे. कुटुंबाच्या महत्त्वावर भर देतानाच देशाची सेवा करण्याची आणि सामान्य माणसासाठी काम करण्याची तिची इच्छा आहे. तिला कोणत्याच मर्यादा रोखू शकत नाहीत. कसोटी कितीही कठीण असली तरी तिने स्वतःसाठी निश्चित केलेले लक्ष्य साधण्यासाठी कितीही परिश्रम घेण्याची तिची तयारी आहे.
प्रोमो इथे बघा: https://www.instagram.com/reel/CvKQ-_MgZ-O/?igshid=MzRlODBiNWFlZA==
ह्या भूमिकेसाठी होकार देण्याचे कारण सांगताना सुंबुल म्हणाली, “मला हे कथानक खूप प्रगतीशील आणि आजच्या काळाशी सुसंगत वाटले. सामान्य माणसाला मदत करण्याची तिची कळकळ आणि त्यासाठी IAS अधिकारी बनण्याची जिद्द मला या मालिकेकडे आकृष्ट करणारी ठरली. एका मध्यमवर्गीय कुटुंबात ती वाढली असूनही तिच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या आहेत. आपले स्वप्न साकार करण्यासाठी लहान-मोठ्या कसोट्यांना तोंड देण्याची जी दृढता तिच्यात आहे, तिने मला या भूमिकेसाठी होकार देण्यास भाग पाडले.”