Home शासकीय संभाजीनगर येथील कामगार चाळीतील सर्व कर्मचाऱ्यांना 31 जुलैपर्यंत खोल्या रिकाम्या करणेच्या नोटीसा

संभाजीनगर येथील कामगार चाळीतील सर्व कर्मचाऱ्यांना 31 जुलैपर्यंत खोल्या रिकाम्या करणेच्या नोटीसा

2 second read
0
0
44

no images were found

संभाजीनगर येथील कामगार चाळीतील सर्व कर्मचाऱ्यांना 31 जुलैपर्यंत खोल्या रिकाम्या करणेच्या नोटीसा

कोल्हापूर  :- शासनाच्या निर्देशानूसार जुन्या व मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींच्यावर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील महापालिकेच्या कामगार चाळ येथील 5 जुन्या इमारती नादुरुस्त व धोकादायक झाल्या आहेत. या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होऊन जिवीत हानी टाळण्यासाठी इस्टेट विभागमार्फत चाळीतील 80 कर्मचाऱ्यांनी दि. 31 जुलै 2023 अखेर खोल्या रिकाम्या करण्याच्या नोटीसा दिल्या आहेत.

यानंतर महापालिकेच्या विभागीय कार्यालय 1 गांधी मैदान व इस्टेट विभागामार्फत कामगार चाळीतील सर्व कुटुंबांना दि. 1 ऑगस्ट 2023 रोजी निवारा केंद्रामध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहे. या दिवशी एम.एस.ई.बी. कार्यालयास कळवून विद्युत भागामार्फत चाळीतील सर्व इमारतींचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. तसेच दि.1ऑगस्ट 2023 पासून संभाजीनगर कामगार चाळमधील सर्व सफाई कर्मचाऱ्यांची मासिक वेतनामधुन घरभाडे कपात थांबविण्यात येणार आहे. महापालिकेने दिलेल्या मुदतीच्या आत स्थलांतर न केल्यास कामगार चाळीतील सर्व कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. हि इमारत रिकामी झालेनंतर चाळीतील इमारतीच्या आजू बाजूला कोणी येऊ नये याकरीता बॅरेकटींग करण्यात येणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…