Home शासकीय भाव्य पूरस्थिती काळात कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी -राजेश क्षीरसागर

भाव्य पूरस्थिती काळात कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी -राजेश क्षीरसागर

2 second read
0
0
29

no images were found

भाव्य पूरस्थिती काळात कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी -राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा भारतीय हवामान वेधशाळेने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार सावधानतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. धरण क्षेत्रासह जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाची पाऊस सुरु आहे. त्यामुळे या अतिवृष्टीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी आणि विशेषतः पुरप्रवण क्षेत्रातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, स्वत:ची काळजी घ्यावी. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात मदतकार्यासाठी सज्ज असून, शहरातील नागरिकांनी आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी शिवसेना हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचे आवाहन राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

ते पुढे म्हणाले, सन २०१९ आणि २०२१ च्या भयान महापुराची भीषणता कोल्हापूरवासीयांनी अनुभवली आहे. त्या आठवणी आजही ताज्या असताना कोल्हापूर जिल्हा पुन्हा संभाव्य पूरस्थितीच्या उंबरठ्यावर आहे. खासकरून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, राधानगरी, शाहुवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भुदरगड तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अंदाजित पाऊसमानानुसार नदी व नाल्यांच्या पात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. यासह राधानगरी धरणही काठोकाठ भरले आहे. धरणाची स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. शहरातील पूरप्रवण क्षेत्रासह जिल्ह्यातील नदी काठावरील गावांतील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. संभाव्य पूरस्थितीची जाणीव झाल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी शिवसेनेच्या हेल्पलाईन नंबरशी संपर्क साधावा असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.

शिवसेना हेल्पलाईन नंबर

-७०२८०३९०९९, ७०२८०४९०९९, ७०२८०७९०९९-

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

  ‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प   कोल्हापू…