
no images were found
इचलकरंजी शहराला पाणी द्यायला दूधगंगा नदीकाठाच्या गावांचा विरोध
कोल्हापूर :- कोल्हापूरच्या दूधगंगा नदी काठावरील गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा इशारा दिला आहे. इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारकडून सुळकूड पाणी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र पाणी द्यायला दूधगंगा नदीकाठाच्या गावांचा विरोध आहेत.
इचलकरंजीसाठीच्या सुळकूड पाणी योजनेवरुन दूधगंगा बचाव कृती समितीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुळकूड, कसबा सांगाव, मौजे सांगाव रणदिवेवाडीसह अन्य गावे कर्नाटकमध्ये सामील होण्याचा ठराव करण्याच्या तयारीत आहे. दूधगंगा बचाव कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला.