no images were found
भाषा संस्कृती, मुंबईकरांचे प्रश्न या आदी विविध मुद्यांवर लक्ष केंद्रीत…शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे तोप डागणार…
मुंबई :- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी योग्य अभ्यास करून, प्रांत, भाषा संस्कृती, मुंबईकरांचे प्रश्न या आदी विविध मुद्यांवर लक्ष केंद्रीत करणार आहेत.
महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदी भाषिक मतदारांना वळवण्याचा राज्यातील प्रमुख पक्षांचा प्रयत्न सुरू आहे. यातच आता येत्या २२ जुलै रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उत्तर भारतीयांचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आले असून त्याठिकाणी उद्धव ठाकरे हिंदी भाषिक लोकांना संबोधन करणार आहेत.
शिवसेनेच्या फुटीनंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरूवात केली आहे. आपल्या महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरूवात त्यांनी विदर्भातून केली असून त्यांनी अमरावती आणि नागपुर येथे जाहीर सभा घेऊन शिंदे आणि फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बाल्लेकिल्ला समजला जातो. ठाण्यातूनच एकनाथ शिंदे विधानसभेवर निवडून आले आहेत. तसचे शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील याच भागातून खासदार आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि इतर पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत.